आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरनेर येथे रुबेला लसीकरणातून ११ विद्यार्थ्यांना विषबाधा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


  अंबड- तालुक्यातील शिरनेर येथे ११ विद्यार्थ्यांना रुबेला लसीकरणातून विषबाधा झाली. सकाळपासून शाळेत लसीकरण सुरू होते. मात्र दुपारी काही विद्यार्थ्यांना शाळेत अचानक थंडी वाजणे, ताप, चक्कर येणे, पोट दुखणे, मळमळ होऊ लागल्याने जागेवरच प्राथमिक इलाज करण्यात आला. मात्र ४ विद्यार्थ्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने तत्काळ अंबड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण ११ विद्यार्थ्यांना अशा प्रकारची बाधा झाली होती. मात्र चार विद्यार्थ्यांना तत्काळ अंबड येथे आणले होते. बाकीच्या विद्यार्थ्यांना लसीकरण टीम सोबत आलेल्या डॉक्टरच्या टीमने जागेवरच उपचार सुरू केले. अंबडपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरनेर येथे जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी लसीकरण होते. सकाळी काही मुलांचे लसीकरण झाले होते. काही मुलांचे बाकी होते. सकाळी लसीकरण झालेल्या ११ मुलांना मळमळ होऊ लागली. ताप, चक्कर येऊ लागली. अंगाला घाम सुटला. काही विद्यार्थ्यांवर शाळेतच उपचार सुरू केले तर त्यातील चार विद्यार्थी अंबडला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. यामध्ये प्रदीप ज्ञानेश्वर इंदुरे, निवेदिता चंद्रहास गायके, पृथ्वीराज कैलास घुगरे, विद्या मंजित कारके यांचा समावेश होता. चार विद्यार्थी अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. बाकीच्या ७ विद्यार्थ्यांवर शाळेतच प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. 


लसीकरणाविषयी अफवा पसरवू नये 
पोटभर जेवण न केल्यामुळे अशक्तपणामुळे व आजारी असल्यामुळे असा प्रकार होऊ शकतो. मात्र लोकांनी यामुळे घाबरून न जाता लसीकरणाविषयी अफवा पसरवू नये, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी अनिल बिराजदार यांनी केले. 
 

बातम्या आणखी आहेत...