आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 हजार 111 आंब्यांनी सजवला तुळजाभवानीचा गाभारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर - इतिहासात पहिल्यांदाच मंगळवारी (दि. २१) कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेची हापूस आंब्यांची पूजा मांडण्यात आली. तुळजाभवानी मातेचा पलंग पालखीचे मानकरी जितेंद्र भगत यांच्या वतीने करण्यात आलेल्या या पूजेसाठी तब्बल ११ हजार १११ रत्नागिरीचे हापूस आंबे वापरण्यात आले होते. या वेळी तुळजाभवानी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.


तुळजाभवानी मातेच्या पलंग पालखीचे मानकरी नगर येथील जितेंद्र भगत यांच्या वतीने तुळजाभवानी मातेची हापूस आंब्यांची पूजा मांडण्यात आली होती. भगत यांनी यावेळी तुळजाभवानी मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट केली होती. तत्पूर्वी भगत यांच्या वतीने तुळजाभवानी मातेची श्रीखंडाची सिंहासन महापूजा करण्यात आली. यावेळी जितेंद्र भगत, त्यांचा पत्नी मोहीनी, वडील जगदीश, मातोश्री पुष्पा यांच्यासह दिनेश, घनश्याम, ओंकार, उमेश, रामकृष्ण, सचिन आदी भगत कुटुंबीयांचे उपस्थिती होती. भगत कुटुंबीयांच्या वतीने भाविकांना प्रसाद म्हणून हापूस आंब्याचे वाटप करण्यात आले. सकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी मातेची धुपारती करून अंगारा काढण्यात आला. त्यानंतर हापूस आंब्याची आरास मांडण्यात आली. यावेळी देवीचे सिंहासन ११ हजार १११ हापूस आंब्यांनी भरण्यात आले. सायंकाळच्या अभिषेक पूजेपर्यंत म्हणजेच सायंकाळी ७ वाजेपर्यंत हापूस आंब्याची आरास भाविकांना दर्शनासाठी खुले होती.


फुलांचे मोर लक्ष वेधून घेत होते : चांदी दरवाजा, न्हाणी गेट आदी तीन ठिकाणी फुलांपासून साकारण्यात आलेले आकर्षक मोर लक्ष वेधून घेत होते. जरबेरा, ऑर्चीड, लिथीयम आदी  फुलांपासून मंदिरात सजावट करण्यात आली होती. यासाठी पुणे येथील ४० कारागिरांनी २ दिवस व २ रात्री परिश्रम घेतले.


मंदिरात फुलांची आकर्षक सजावट,  सिंहगाभारा, राजे शहाजी महाद्वारही सजवले
भगत कुटुंबीयांच्या वतीने तुळजाभवानी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यासह, सिंहगाभारा, होमकुुंड, राजे शहाजी महाद्वार, राजमाता जिजाऊ महााद्वार, निंबाळकर दरवाजा आदींसह मातेचा पलंगावरही जितेंद्र भगत यांच्या वतीने  मातेची हापूस आंब्याची आरास करण्यात आली होती. तत्पूर्वी मंदिरात सर्वत्र फुलांची  सजावट करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...