आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 वेळेस आमदार राहीलेले गणपतराव देशमुखांची मोठी घोषणा, तब्येत साथ देत नसल्याने यंदाच्या विधानसभेतून माघार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अकरा वेळेस आमदार होऊन विक्रम केलेले सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकृती साथ देत नसल्याचे कारणाने विधानसभा लढवणार नसल्याचे नुकतेच त्यांनी स्पष्ट केले आहे.


अत्यंत साधी, सामान्य नागरीकांप्रमाणे राहणी असलेल्या गणपतराव देशमुखांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. प्रकृती साथ देत नसल्यामुळे देशमुखांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. सांगोला तालुक्यातील कोळा येथील कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी याबाबत घोषणा केली आहे. दरम्यान शेकापचा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी या निमित्ताने स्पष्ट केले आहे.


2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 94 हजार 374 मते मिळवून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा पराभव केला होता. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागेल आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. त्यात काही वरिष्ठ नेत्यांच्या मतदारसंघासाठी चाचपणीही सुरू झाली आहे. तसेच पक्षातील कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचेही आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.


गणपतराव देशमुखांचा परिचय
10 ऑगस्ट 1926 रोजी गणपतराव देशमुखांचा जन्म झाला. गणपतराव हे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आहेत. 1962 साली त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढली होती. त्यानंतर 1972 आणि 1995 चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांना भरभरुन मतांनी विजयी केले आहे. विशेष म्हणजे 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारनेही त्यांचा गौरव केला होता.
 

बातम्या आणखी आहेत...