आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चट्ट्या बाप्या खून खटल्यातील ११ साक्षीदारांनी फिरवली साक्ष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरात १२ वर्षांपूर्वी झालेल्या चट्ट्या-बाप्या खून प्रकरणात प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार व इतरांनी साक्ष फिरवल्याने सर्व आठ संशयितांची सोमवारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या खून खटल्यात सबळ पुरावे असतानाही ११ साक्षीदारांनी साक्ष फिरवली असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांनी दिली. 


सुरेश सोनवणे उर्फ चट्ट्या-बाप्या खून प्रकरणात महेश चिंचोलकर, दिलीप बाबा भोसले, शंकर दिलीप भोसले, शंभू दिलीप भोसले, ललित माधव कुंवर, शकील शेख अकबर शेख, राहुल शांताराम सोनवणे, सचिन उर्फ फावड्या अरुण पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे सर्व संशयित निर्दोष सुटले आहेत. गेल्या भोपा काठेवाडी याच्या फिर्यादीवरून चट्ट्या बाप्या खून प्रकरणी आठ संशयितांविरोधात १६ जुलै २००७ रोजी शहर पाेलिसात गुन्हा दाखल होता. त्याचा तपास तत्कालीन एपीआय अशोक गणपत कोलते यांच्याकडे होता. संशयितांनी चट्ट्या-बाप्या सोनवणे व गेल्या भोपा काठेवाडी यांना १५ जुलै २००७ रोजी चर्चेसाठी शाहू महाराज हॉस्पिटल आवारात बोलावले होते. त्यानुसार कारने दोघे दवाखान्यात गेले होते. त्या वेळी संशयित तेथे बसलेले होते. काही संशयित दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी तलवार, चॉपर, दांडा, आसाऱ्यांनी चट्ट्या बाप्यासह गेल्या याच्यावर वार केले होते. यात दोघे जखमी झाले होते. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. १८ जुलै रोजी तीन दिवसांनी सहयोग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना चट्ट्या बाप्याचा मृत्यू झाला होता. 


सन २०१४ पासून सुरू हाेते खटल्याचे कामकाज 

२०१४पासून या खून खटल्याचे कामकाज सुरू झाले होते. न्यायाधीश ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात या खटल्यात कामकाज झाले. यात सरकार पक्षातर्फे २० साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी ११ साक्षीदार फितूर झाले. त्यात सोमवारी निकाल देण्यात आला. सर्व संशयितांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. 
 

बातम्या आणखी आहेत...