आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeTooचा परिणाम / 11 दिग्दर्शिकांचा निर्णय, लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध झालेल्या व्यक्तींसोबत कधीच काम करणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झोया अख्तर, नंदिता दास आणि गौरी शिंदे - Divya Marathi
झोया अख्तर, नंदिता दास आणि गौरी शिंदे

बॉलिवूड डेस्कः MeToo चे वादळ शमायचे नाव घेत नाहीये. बॉलिवूडची अनेक मोठी नावे यात अडकली आहेत. लैंगिक अत्याचाराचे आरोप सिद्ध झालेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत काम करणार नसल्याचे महिला दिग्दर्शिकांनी स्पष्ट केले आहे. मीटू मोहिमानंतर बॉलिवूडमधील अनेक महिलांनी उघडपणे त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला सार्वजनिकरित्य वाचा फोडली आहे.दिग्दर्शिका सोनाली बोस यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एक पत्रक जारी केलं आहे. यामध्ये सर्व महिला दिग्दर्शकांची नावे आहेत. इंडस्ट्रीमधील अशा कोणत्याच व्यक्तीसोबत काम करणार नाही, ज्यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत, असे या पत्रकात म्हटले गेले आहे.   

 

या 11 दिग्दर्शिकांच्या नावांचा समावेश...
सोनाली बोस यांनी आपल्या पोस्टमध्ये 11 महिला दिग्दर्शकांच्या नावाचा उल्लेख केला आहे. सोनाली यांच्यासह अलंकृता श्रीवास्तव, गौरी शिंदे, किरण राव, कोंकणा सेन शर्मा, मेघना गुलजार, नंदिता दास, नित्या मेहरा, रीमा कागती, रुची नरेन आणि झोया अख्तर यांच्या नावाचा यात समावेश असून या सगळ्यांनी मीटू मोहिमेला पाठिंबा दिल्याचे पत्रकामध्ये नमूद केले आहे. 

 

काय लिहिले आहे पोस्टमध्ये...
आम्ही सर्व महिलांसोबत आहोत. ज्या महिलांनी समोर येऊन आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडली, त्यांचा आम्ही सन्मान करतो आणि त्यांच्या हिंमतीला दाद देतो. 

 

 

यांनीही दिला पाठिंबा...
यापूर्वी आमिर खानने मोगूल हा चित्रपट सोडला. तर अक्षय कुमारने हाउसफुल-4 चे चित्रीकरण थांबवले. तर अजय देवगणने त्याच्या कंपनीतील लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींसोबत काम करण्यास नकार दिला. 

 

बातम्या आणखी आहेत...