आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रक्रियेला घाबरून 11 वर्षांच्या मुलीची घरी गळफास घेऊन आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - जिभेखाली आलेली गाठ शस्त्रक्रिया करून काढावी लागणार असल्याने डॉक्टर आणि वडील यांच्यातील संवाद एेकून शस्त्रक्रियेला घाबरलेल्या अकरा वर्षांच्या बालिकेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजता अंबाजोगाई शहरातील परळी वेस भागात घडली. प्रियंका सुभाष लोंढे (वय ११) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तिने यंदा चौथीची परीक्षा दिली होती. 


प्रियंकाच्या जिभेखाली गाठ आल्याने तिचे वडील सुभाष लोंढे यांनी तिला येथील स्वाराती रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. डॉक्टरांनी तपासल्यानंतर जिभेखालील गाठ शस्त्रक्रिया करून काढावी लागेल, असा सल्ला वडिलांना दिला. दवाखान्यात डॉक्टर व वडिलांमधील संभाषण तिने ऐकले होते. आता आपल्यावर शस्त्रक्रिया होणार या कल्पनेने ती घाबरली. या भीतीपोटी तिने सोमवारी सायंकाळी ५ वाजता परळी वेस येथील राहत्या घरी पत्र्याच्या आडूला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.