आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यास करत नव्हता 11 वर्षाचा मुलगा, आईने हातातीन व्हडिओ गेम घेउन रागवले, नंतर मुलाने उचलले हे पाउल...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्लीवलंड-  अमेरिकेच्या ओहियोमध्ये एका 11 वर्षाच्या मुलाने असे काही केले की, ज्यामुळे लोकांचा जीव धोक्यात पडला. ओहिओमध्ये राहणारा 11 वर्षाचा मुलगा, आईने हातातील व्हिडिओगेम घेऊन अभ्यास कर म्हणाली म्हणुन नाराज झाला. रागारागात तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. घरच्यांना वाटले एव्हाना तो झोपला असेल. पण रात्री घरी आला पोलिसांचा कॅाल ज्याने घरच्यांची झोप उडवली.

 

>> त्या दिवशी त्या मुलाच्या वडिलांना घरी यायला उशीर होणार होता, म्हणुन मुलाची आई घरातीन काम आटपुन झोपी गेली. रात्री अचानक तिला ओहिओ पोलिसांचा कॅाल आला. पोलिसांनी जे काही सांगितले ते एैकुन त्याच्या आईची झोप उडाली.  ती घाईघाईत पोलिसांनी सांगितलेल्या जागेवर गेली. 


काय झाले होते त्या रात्री ?

>> त्या रात्री आईने रागावल्यानंतर, मुलाने गुपचुप त्यांच्या घरातील लग्झरी कार बाहेर घऊन गेला. ईतक्या कमी वयात स्पोर्ट्स कार घेऊन वेगाने पळवत असताना एका मिनी ट्रकला टक्कर दिली. पोलिसांनी सांगितले की, तो 120 kmph ईतक्या वेगाने कार चालवत होता, ज्यामुळे अनेक लोकांचा जीव धोक्यात होता.

 

>> ट्रकला टक्कर मारताच कारचा चुराडा झाला. तो पण या अपघातात जखमी झाला असून त्याला रूग्नालयात दाखल करण्यात आले.

 

आधीपण केले आहे असे काम

>> मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याने या आधीपण असा प्रकार केला आहे. त्याने मागच्या वर्षी घरातील कार घेऊन गेला होता. त्यवेळेस पोलिसांनी त्याला पकडले होते.

 

>> त्या घटनेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते, पण कमी वय असल्यामुळे सोडुन देण्यात आले. पण या वेळेस अशा प्रकारे लोकांचा जीव धोक्यात घातल्यामुळे त्याला शिक्षा होउ शकते. 

बातम्या आणखी आहेत...