आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 Years Of Chak De India: फिल्मची गर्ल गँग.. कुणाचे झाले लग्न तर कुणी आहे फिल्म इंडस्ट्रीपासून लांब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः ‘चक दे इंडिया’रिलीज होऊन 10 |ऑगस्ट रोजी 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. रिलीजच्या एवढ्या वर्षानंतरही या चित्रपटाला अजून कोणीही विसरलेले नाही. याचे कारण हे की, चित्रपट रिलीज होण्याअगोदरच याचे टायटल स्लोगन बनले होते. आज हॉकी असो अथवा क्रिकेट ‘चक दे इंडिया’हे गाणे आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल. या चित्रपटातील गाण्याप्रमाणेच यातील कलाकारांनाही कोणीही विसरु शकणार नाही. या चित्रपटातील सर्व अभिनेत्री आजही एकमेकींच्या संपर्कात आहेत.

 

आजही एकमेकींच्या संपर्कात आहेत चक दे गर्ल्स.. 

या चित्रपटातील शिल्पा शुक्ला (बिंदिया नायक) आणि आर्या मेनन (गुल इकबाल) यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की आजही त्या एकमेकींच्या संपर्कात आहेत. जीवनात कोणताही प्रॉब्लेम आला तरी तो एकमेकांशी शेअर करतो. चित्रपटाचे दिग्दर्शक शिमित अमिन आणि लेखक जयदीप साहनी यांनी एक किस्सा शेअर करताना सांगितले की, हा चित्रपट रिलीजअगोदर काही मित्र, कुटुंबियांना दाखवला होता तेव्हा चित्रपटात शाहरुख खान तर आहे पण कोणी हिरोईन नाही, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. पण रिलीज झाल्यानंतर चित्रपट सर्वांना आवडला.

 

जाणून घेऊयात, चित्रपटातील या सर्व अभिनेत्री आज आज कुठे आहेत आणि काय करतात...

 

सागरिका घाटगे
‘चक दे इंडिया’या चित्रपटामुळे लाइमलाइटमध्ये आलेली अभिनेत्री सागरिका घाटगे 23 नोव्हेंबर 2017 क्रिकेटपटू झहीर खानसोबत विवाहबद्ध झाली. नोंदणीपद्धतीने दोघांनी लग्न केले. 2007 साली 'चक दे इंडिया' या चित्रपटातून सागरिकाने फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. या चित्रपटात तिने प्रीती सभरवाल ही व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटानंतर तिने फॉक्स, मिले ना मिले हम, रश, जी भर के जी ले, इरादा या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. शिवाय प्रेमाची गोष्ट या चित्रपटातून तिची मराठी चित्रपटसृष्टीतही एन्ट्री झाली आहे. लवकरच सागरिका मान्सून फुटबॉल या चित्रपटात झळकणार असून हा मराठी चित्रपट आहे.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, चक दे गर्ल्स आता कुठे आहेत..

बातम्या आणखी आहेत...