आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेनमधल्या पार्सलमधुन येत होता घाण वास, RPF स्टाफला आला संशय, चौकशी करताच पळाले आरोपी....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- तमिलनाडुत RPF ने शनिवारी चेन्नईच्या एग्मोर स्टेशनवरून अंदाजे 1100 किलो डॉग मीट पकडले आहे. हे मीट थर्माकोलच्या 11 बॉक्समध्ये भरून नेले जात होते. बॉक्समधुन घाण वास आल्यावर पोलिसांनी ते बॉक्स घेउन जाणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते बॉक्स टाकुन पळुन गेले. फुड सेफ्टी डिपार्टमेंटच्या आधिकाऱ्यांनी सांगितले की, हे मांस सडण्याच्या अवस्थेत आले होते, आणि ते हॉटेलमध्ये सप्लाई करण्यासाठी घेउन जात होते.


येत होता घाण वास
- ही घटना 17 नोव्हेंबर शनिवारी चेन्नईच्या एग्मोर रेल्वे स्टेशनवर सकाळी 10.30 ची आहे. जेव्हा प्लॅटफॉर्म नंबर 5 वर भगतची कोठी-मन्नारगुड़ी ट्रेन येउन थांबली.


- ट्रेन थांबताच त्यातुन काही लोकांनी पार्सल खाली उतरवले, त्यातुन घाण वास येत होता. RPF च्या आधिकाऱ्यांनी जेव्हा त्यांना या वासाबद्दल विचारले तेव्हा ते सर्व जण बॉक्स सोडुन पळुन गेले.

 

- त्यानंतर RPFच्या टीमने ते उघडल्यावर त्यांना त्यात कुत्र्याचे फ्रोजन (जमलेले) मीट दिसले. सगळ्या कुत्र्यांचे पाय आणि डोके कापलेले होते. त्यानंतर फुड सेफ्टी डिपार्टमेंटला बोलवण्यात आले, त्यांनी त्याचे वजन केल्यावर ते 1100 किलो निघाले.

बातम्या आणखी आहेत...