आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 हजार वोल्ट विजेचा झटका लागल्यामुळे ह्रदय शरिरातून बाहेर आले, 3 ऑपरेशन करुन डॉक्टरांनी वाचवला जीव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- राजस्थानमधील जोधपूरचा रहिवासी 14 वर्षीय दिनेश परिहारला दोन महिन्यांपूर्वी 11 हजार वॉल्टचा विजेचा झटका लागला होता. या करंट मुळे त्याचे ह्रदय शरिरातून बाहेर आले होते आणि त्याची जिवंत राहण्याची शक्यता खूप कमी होती. पण, अहमदाबादमधील डॉक्टरांनी तीन मोठे ऑपरेशन करुन दिनेशचा जीव वाचवला. दिनेशवर उपचार करणारे डॉ. विजय भाटियाने सांगितले की, दिनेश आणि पळू शकतो, त्याला कार्डियाक संबंधी काहीच समस्या नाहीये. हा मेडिकल सायन्समधील "रेयरेस्ट ऑफ द रेयर" श्रेणीतील इलेक्ट्रिक बर्नची केस होती.
डॉ. भाटियाने सांगितले की, 7 सप्टेंबरला दिनेशला गंभीर अवस्थेत अहमदाबादमध्ये आणले होते. ह्रदयासहित त्याच्या शरीरातील अनेक अवयव जळाले होते. त्याच्या निकटवर्तियांनी सांगितले की, त्याला हायटेंशन वायरमधून 11 हजार वॉल्टचा करंट लागला होता. पहिला झटका लागताच दिनेश जमिनीवर कोसळला, जमिन ओली असल्याने करंट जमिनीत उतरला आणि त्याच्या संपूर्ण शरिरात करंट पसरला आणि त्याच्या शरिरात मोठ्या जखमा होऊन त्याचे ह्रदय बाहेर आले.

शरीराच्या चांगल्या भागांनी हृदयाला कव्हर केले
 
दिनेशच्या उजव्या भागातील चांगली त्वचा आणि स्नायूचा काही भाग काढून त्याने दिनेशचे ह्रदय कव्हर करण्यात आले. त्यानंतर दोन ऑपरेशन करुन दिनेशचे इतर जखमी भाग ठीक करण्यात आले. दिड महिन्यांच्या उपचारानंतर दिनेश ठीक झाला.

बातम्या आणखी आहेत...