आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार वर्षांत 1159 शेतकऱ्यांची आत्महत्या; सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आत्महत्येचे मुख्य कारण 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- सर्वाधिक सुपीक जमीन असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात चार वर्षांत एक हजार १५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 

 

गेल्या एक वर्षांत जिल्ह्यात २५९ आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा ही प्रमुख कारणे या आत्महत्येच्या बुडाशी आहेत. गेल्या चार वर्षांची आकडेवारी पाहू जाता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना २०१५ या वर्षांत सर्वाधिक घडल्याचे दिसून येते. २०१५ या वर्षांत ३८६ आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात मागील वर्षी २५९ शेतकऱ्यांनी गळफास किंवा विष प्राशन करून मरणाला जवळ केले. 

 

मागील वर्षांतल्या सप्टेंबर महिन्यात शेतकरी आत्महत्येच्या ३८ घटना घडल्या आहेत. गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात एक हजार १५९ आत्महत्येच्या घटना घडल्या असल्या तरीही यात ४८० प्रकरणे पात्र ठरवण्यात आली, तर ६८२ प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली. जिल्ह्यात शेती क्षेत्रात अवकळा आल्याचेच चित्र असून या वर्षी पावसाने ताण दिल्याने सलग चौथ्या वर्षी शेतकरी आर्थिक अरिष्टातून जात आहे. कागदावर का होईना पण जिल्ह्याला सिंचन क्षेत्रही लाभले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सावरण्यासाठी काही साधने हाताशी असतानाही नैसर्गिक अवकृपेमुळे पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठय़ावर आहे. कर्जबाजारीपणा यामुळे या घटना घडू लागल्या आहेत. शेतकरी आत्महत्येच्या वाढते आकडे ही चिंतेची बाब आहे.

 

सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ३८ आत्महत्या 
सन २०१८ मध्ये जानेवारी महिन्यात १७, फेब्रुवारीत २०, मार्च १३, एप्रिल ९, मे १८, जून १७, जुलै १८, ऑगस्ट २५, सप्टेंबर ३८, ऑक्टोंबर २७, नोव्हेंबर २४ आणि डिसेंबरमध्ये सर्वाधिक ३३ शेतकऱ्यांची आत्महत्या करून आपले जीवन संपविले. यापैकी ४१ शेतकरी कुटुंबीयांना मदत मिळाली आहे. 

 

शेतकरी आत्महत्येत जिल्हा देशात आघाडीवर 
शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नांचा विषय आता देशपातळीवर पोहोचला आहे. यातही यवतमाळ जिल्हा यामध्ये अग्रक्रमावर आहे. हजारो शेतकऱ्यांनी येथे आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे सर्व फोकस हा जिल्ह्यावरच राहत आहे. कोट्यधींचे पॅकेज घोषित झाले, मात्र, समस्या अजून कायमच आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...