आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासायबेरिया - रशियाच्या सर्वात थंड प्रदेशात म्हणजे सायबेरियामध्ये मिळालेल्या एका गूढ मूर्तीने जगाच्या अस्तित्वाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. शास्त्रज्ञांनी 1894 मध्ये ही 17 फूटी शोधली होती. पण सुमारे 124 वर्षांनंतर या मूर्तीचे सत्य जगासमोर आले आहे. ही मूर्ती सुमारे 11,600 वर्षे जुनी असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे काही अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत, ज्या मनुष्य लिहू शकत नाही. त्यामुळे तिसऱ्या जगातील लोकांनी ही तयार केली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक रहस्ये उलगडणार?
11 हजार वर्षांपूर्वी लाकडाच्या या मूर्तीवर जे काही लिहिण्यात आले होते, ते वाचून डिकोड करण्याचा प्रयत्न जगभरातील शास्त्रज्ञ करत आहेत. या लिखाणावरून जगातील अनेक रहस्ये समोर येतील ही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पिरॅमिड्सपेक्षाही जुन्या असलेल्या यामूर्तीचे नाव 'शिगिर आयडल' ठेवले आहे. 1997 मध्ये जुन्या काबर्न डेटिंग तंत्राने ही मूर्ती 9500 वर्षे जुनी असल्याचे सांगितले होते. पण नव्या तंत्राने ही मूर्ती 11,600 वर्षे जुनी असल्याचे सांगितले आहे.
एवढे वर्षे सुरक्षित कसे राहिले लाकूड
साधारणपणे लाकडाचे वय काही शेकडो वर्षांचे असते. पण लाकडाची ही मूर्ती आणि त्यावरील लिहिलेला मजकूर हजारो वर्षांनंतरही कसा सुरक्षित राहिला, यावर तज्ज्ञ हैराण आहेत.
सोन्यासाठी खोदकाम करताना मिळाली होती मूर्ती
- मीडिया रिपोर्ट्सनुसार लाकडाची ही गूढ मूर्ती शिगिर परिसरात खोदकाम करणाऱ्या मजुरांना सापडली होती. या परिसरात सोन्यासाठी खोदकाम सुरू होते. तेव्हा जमिनीखाली जवळपास साडे तेरा फूट खोल ही मूर्ती आढळली.
- नक्षीकाम केलेल्या या मूर्तीच्या चेहऱ्यावर डोळे, नाक, तोंड तर आहे, पण शरीर पूर्ण सपाट आहे. मूर्तीचे तोंड असे आहे, जणू ते काही बोलत असावे.
जगातील सर्वात जुन्या मूर्तीचा दर्जा
- तज्ज्ञांनी कार्बन डेटिंगच्या आधारे या मूर्तीला जगातील सर्वात जुनी मूर्ती असल्याचा दर्जा देण्यात आला आहे. सध्या ती रसियाच्या येसटेरिनबर्ग म्युझियममध्ये प्रदर्शनासाठी ठेवली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.