आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये मेगागळती; पक्षाचे 12 आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात ? राजकीय वर्तुळात चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमदार फुटण्याची भीती भाजपने फेटाळून लावली

मुंबई- राज्याचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा एक आठवडा पूर्ण होत आहे. या दरम्यान आता भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. निवडणुकांपूर्वी भाजप सत्तेत येईल, या आशेवर काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले डझनभर आमदार स्वगृही परतणार असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. निवडणुकांपूर्वी भाजप परत सत्तेत येईल, असे वाटल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये सहभागी झाले. पण, विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेना-भाजपचे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरुन बिनसले आणि सत्ता पलटली. त्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत महाविकास आघाडी स्थापन केली आणि सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप सत्तेबाहेर राहावे लागले. त्यामुळेच भाजपचे 12 आमदार महाविकास आघाडीत सामील होत असल्याची चर्चा सुरू आहे.दरम्यान, आमदार फुटण्याची चर्चा भाजपनं फेटाळून लावली आहे. ''भाजपचा एकही आमदार फुटणार नाही. महाविकास आघाडीच्या आमदारांमध्येच अस्वस्थता असून ते बंड करण्याच्या तयारीत आहेत. त्या भीतीतून अशा अफवा पसरवल्या जात असून या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत,'' असा पलटवार भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...