आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या गोळीबारात आईच्या कुशीतील १२ दिवसीय मुलगा मारला गेला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू  - जम्मू-काश्मिरात पाकिस्तानकडून सतत दोन दिवस सीमेपलीकडून गोळीबार झाला. या गोळीबारात पूंछमधील शाहपूर गावात १२ दिवसांपूर्वी जन्मलेल्या बाळाचा मृत्यू झाला. ही पहिलीच वेळ आहे की फक्त १२ दिवसांचा मुलगा पाकिस्तानी गोळीबारात मारला गेला. गोळीबारात या मुलाची आई फातिमा जानदेखील गंभीर जखमी झाली आहे. त्यांना पूंछहून जम्मू मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले आहे. या कुटुंबाने अजून त्या बाळाचे नावदेखील ठरवले नव्हते की त्याची गणना सीमेवर मरणाऱ्या नागरिकांत करण्यात आली आहे. मुलाचे जन्माचे प्रमाणपत्र मिळण्यापूर्वीच त्याचे मृत्यू प्रमाणपत्र त्यांना घ्यावे लागले.  बाळाचे वडील मोेहंमद कासीम यांनी सांगितले की, रविवारी पाऊस पडत होता. सायंकाळी चार वाजता पाकिस्तानने गोळीबार सुरू केला. आम्ही सर्वजण घरात बसलो. तेवढ्यात एक तोफगोळा दरवाजाजवळ येऊन फुटला. त्या वेळी फातिमा बाळाला कुशीत घेऊन बसली होती. गोळ्यातील छर्रे भिंत फोडून फातिमा यांच्या गुडघे आणि बाळाच्या पोटात घुसले.

बातम्या आणखी आहेत...