आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली : पुढच्या वर्षी जपानमध्ये आगामी ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये 33 खेळ प्रकारांचा समावेश आहे. यातील सहभागी 12 खेळांकडे भारत सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. या 12 खेळांचा प्राधान्यांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. यातूनच या खेळ प्रकारातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आणि प्रशिक्षण शिबिरातील सहभागीसाठी स्वत:च्या खिशातून खर्च करावा लागणार आहे. यासाठी क्रीडा मंत्रालयाकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळणार नाही. ऑलिम्पिक क्वालिफायरसाठीही या खेळांतील सर्वच खेळाडूंना खर्च करावा लागणार आहे. ऑलिम्पिकनंतर २०२२ मध्ये एशियाड हाेणार आहे.
सीनियर नॅशनल चॅम्पियनशिपसाठी 5 हजार : भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) वतीने प्राधान्य असलेल्या खेळातील खेळाडूंच्या विदेश आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील खर्च करण्यात येते. यात सब ज्युनियर साठी 10 हजार, ज्युनियर नॅशनल साठी 7 हजार, सिनियरसाठी ५ हजारांचा समावेश आहे. इतर खेळासाठी ही सुविधा उपलब्ध नाही.
तलवारबाजी : 36 ऑलिम्पिक पदकांचा दावा; मात्र, फेडरेशनची मदत
तलवारबाजीमध्ये ऑलिम्पिकसाठी एकूण ३६ पदके आहेत. तरीही या खेळाकडे दुर्लक्ष करण्यात आले. याचा प्राधान्यांच्या यादीत समावेश करण्यात आला नाही. भारतीय तलवारबाजीपटू भवानी देवीने काॅमनवेल्थमध्ये एका राैप्य, दाेन कांस्य, एशियन चॅम्पिनयशिपमध्येही एक राैप्य, दाेन कांस्यची कमाई केली हाेती. गत वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भवानी देवीने राैप्यपदकाची कमाई केली हाेती. आता तिला ऑलिम्पिकमधील सहभागासाठीची प्रबळ दावेदार मानले जाते. गाे स्पाेर्टस फाउंडेशनकडून या खेळातील खेळाडूंना मदत केली जाते. 'आमचा खेळ हा रॅकिंगवर आधारित आहे ', अशी प्रतिक्रिया महासचिव बशीर खान यांनी दिली.
स्केट बाेर्डिंग : अभिजितला सुवर्णपदक
इयत्ता बारावीमधील विद्यार्थी अभिजित अमलराज हा गतवर्षी जागतिक राेलर गेम्स स्पर्धेत चॅम्पियन ठरला हाेता. त्याने या स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून दिले हाेते. यापूर्वीही त्याने या स्पर्धेत दाेन राैप्यसह एका कांस्यपदकाची कमाई केली हाेती. स्केट बाेर्डिंगचा ऑलिम्पिक गेम्समध्ये समावेश आहे. मात्र, तरीही क्रीडा मंत्रालयाकडून या खेळाकडे दुर्लक्ष केले जाते. याला आर्थिक अशी माेठी तरतूदही करण्यात आली नाही.
कराटे : तीन वर्षांत 10 आंतरराष्ट्रीय पदके
गत तीन वर्षांपासून कराटेमध्ये खेळाडू सर्वाेत्तम कामगिरी करत आहेत. यातून गत 3 वर्षांत कराटेमध्ये खेळाडूंनी 10 आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई केली आहे. याशिवाय 2017 मध्ये 2 राैप्य, 3 कांस्यपदकेही जिंकली आहेत. 'आताही ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकण्याची क्षमता भारतीय कराटेपटूंमध्ये आहे. मात्र, याकडे विशेष प्रकारचे लक्ष दिले जाण्याची गरज आहे. आर्थिक पाठबळ सक्षम नसल्याने हे खेळाड सिद्ध करण्यात कमी पडतात.
ऑलिम्पिकमध्ये सहभागी; तरीही वगळले: बेसबॉल, तलवारबाजी, गोल्फ, कराटे, मॉडर्न पेंटाथलॉन, रग्बी-7, स्केट बोर्डिंग, सॉफ्टबॉल, क्लाइंबिंग, सर्फिंग, तायक्वांदाे, ट्रायथलॉन.
रग्बीत महिला टीम क्रमवारीत टाॅप-10 मध्ये: पुुरुष संघ 12 व्या स्थानी
भारतीय महिला आणि पुरुष खेळाडूंनी रग्बी या खेळातही प्रचंड प्रगती साधली आहे. सातत्याने चमकदार कामगिरी करत भारताच्या महिला संघाने रग्बीच्या आशियाई क्रमवारीत टाॅप-10 मध्ये स्थान मिळवले. भारताचा महिला संघ नवव्या स्थानावर आहे. तसेच पुरुषांचा संघ हा क्रमवारीत १२ व्या स्थानावर आहे. रग्बी-7 या खेळ प्रकाराचा ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश आहे. माॅडर्न पेंटाथलाॅनचे सहसचिव विकास गुप्ता यांच्या मते, 2018 आशिया कपमध्ये पुुरुष आणि महिला संघाने प्रत्येकी दाेन कांस्यपदकाची कमाई केली हाेती. त्यामुळे या संघांकडून आता ऑलिम्पिक स्तरावरही अव्वल कामगिरीची आशा केली जात आहे.
28 वेळा ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ; 24 पदके जिंकली
भारतीय संघाने पहिल्यांदा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला हाेता. म्हणजेच 1900 पासून भारताच्या संघाने या स्पर्धेतील सहभागासाठी सुरुवात केली आहे. आतापर्यंत भारताच्या संघाने 28 वेळा सहभाग घेतला आहे. यातील 24 वेळा भारताने स्पर्धेत पदकाची कमाई केली आहे. भारताने आतापर्यंत 9 सुवर्णांसह 7 राैप्य आणि 12 कांस्यपदके पटकावली आहेत. म्हणजेच भारताच्या नावे आतापर्यंत २८ पदकांची नाेंदस आहे. भारताने हाॅकी या खेळ प्रकारात सर्वाधिक आठ वेळा सुर्णपदकांची कमाई केली आहे. तसेच एक वेळा राैप्य आणि दाेन वेळा कांस्यपदके जिंकली आहेत. त्यामुळे भारताचा या खेळात दबदबा हाेता.
24 जुलैपासून 9 ऑगस्टपर्यंत जपानमध्ये ऑलिम्पिकच्या स्पर्धा
दरवर्षी यादीमध्ये हाेताे बदल, नवीन खेळ सहभागी
साईच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसर आम्ही खेळातील दर्जेदार कामगिरीच्या आधारे दरवर्षी यादी तयार करताे. यात नव्याने काही तरी बदल केले जातात. साहजिकच यात नव्याने खेळांचाही समावेश हाेताे. पुढच्या वर्षी हाेणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी हा बदल केला आहे.
या चार कॅटेगरीमध्ये 56 खेळांची झाली विभागणी
- अधिक प्राधान्य अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन टेनिस, नेमबाजी, वेटलिफ्टिंग, कुस्ती.
- प्राधान्य बास्केटबॉल, बिलियर्ड्स एंड स्नूकर, ब्रिज, चेस, सायक्लिंग, डीफ स्पोर्ट्स, फुटबाॅल, हॅडबॉल, जूडो, कबड्डी, कयाकिंग-केनोइंग, पॅरा स्पोर्ट्स, रोइंग, स्कूल गेम्स, सेपक टकरा, स्पेशल भारत, स्क्वॉश, जलतरण, टेबल टेनिस, वॉलीबॉल, वुशू, याचिंग.
- सर्वसाधारण फेंसिंग.
- इतर आट्या-पाट्या, बाॅल बैडमिंटन, बेसबॉल, बॉडी बिल्डिंग, सायकल पोलो, कराटे, खो- खो, कुडो, मलखांब, मोटर स्पोर्ट्स, नेटबॉल, पेनक सिलट, पोलो, रोल बॉल, रोलर स्केटिंग, रग्बी, शूटिंग बॉल, सॉफ्टबॉल, सॉफ्ट टेनिस, टेनीक्वाइट, टेनिस बॉल क्रिकेट, टेन पिन बॉलिंग, ट्रायथलॉन, टग ऑफ वार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.