आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीकडून प्रफुल्ल पटेलांची 12 तास चौकशी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मिर्ची याच्या बेकायदेशीर संपत्तीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी १२ तास चौकशी केली.

ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पटेल यांनी चौकशीत सहकार्य केले नाही. भविष्यात प्रफुल्ल पटेल आणि एचडीआयएल या रिअल इस्टेट समूहाचे राकेश वधावन यांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी होऊ शकते. ईडीच्या अधिकाऱ्यांनुसार, पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रा.लि.ने २००६-०७ मध्ये सीजाॅय हाऊस नावाची इमारत बनवली होती. तिचा चौथा आणि पाचवा मजला मिर्चीची पत्नी हाजरा इक्बालच्या नावावर करण्यात आला होता. ज्या जमिनीवर ही इमारत उभारण्यात आली होती ती मिर्ची याची असल्याचे सांगितले जाते. 


तपासकर्त्यांच्या दाव्यानुसार, मिर्चीने ही जमीन मनी लाँडरिंग, खंडणी वसुली इत्यादीच्या कमाईतून खरेदी केली होती. चौकशीत पटेल यांनी या व्यवहारात काही चुकीचे असल्याचा इन्कार केला. हा व्यवहार पूर्णपणे पारदर्शक होता हे कागदपत्रांवरून स्पष्ट होते, असे पटेल म्हणाले.
 

बातम्या आणखी आहेत...