आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेक फेल झाल्याने रस्त्याच्या कठड्यावर आदळली पिकअप, 12 जण जखमी दोन गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर - नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर-पिंपळनेर रस्त्यावरील चरममाळ घाटात बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात 12 जण जखमी झाले. मालवाहतूक करणाऱ्या पिकअप मॅक्सचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. या गाडीमध्ये तांदळाच्या गोण्यांबरोबरच प्रवासी बसलेले होते. 


प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सकाळी नऊच्या सुमारास पिकअक क्रमांक एम.एच ४१ जी ४९८१ चा ब्रेक फेल झाला.  गाडीचा वेग जास्त असल्याने ती गतीरोधकावर आदळली. त्यात चालकासह एकजण गंभीर जखमी झाला. काही जणांनी अपघात होत असल्याचे पाहून गाड्यांमधून उड्या मारल्या. त्यात ते जखमी झाले.  


15 फूट घाटात फेकले गेले मुलगा आणि वडील 
या अपघातात अनिल सोमा गवळी आणि त्यांचा ४ वर्षांचा मुलगा सूरज गाडी धडकल्यानंतर घाटामध्ये गाडीतून 15 फुटांवर फेकले गेले. सुदैवाने ते दोघेही गंभीर जखमी झाले नाही. पिकअप गाडीत मका आणि तांदूळ भरून विक्री करण्यासाठी गुजरात राज्यातील उच्छल येथे जात असताना अपघात झाल्याची माहिती नवापूर पोलिसांनी दिली.

 

बातम्या आणखी आहेत...