आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत स्वच्छता करणाऱ्या चाळीसगावच्या मृत भिकाऱ्याच्या बँक खात्यात सापडले १२ लाख

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • भिकारी रेल्वेत साफसफाई करून प्रवाशांकडे भीक मागून उदरनिर्वाह करीत हाेते
  • शेजारचे म्हणाले, बँकेत नित्यनेमाने ये-जा करत

चाळीसगाव - रेल्वेत स्वच्छता करून भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या चाळीसगाव येथील रहिवासी इंदलसिंग फुलचंद ठाकूर यांचा २९ फेब्रुवारीला उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांना त्यांच्या बँक व पोस्ट खात्यात तब्बल १२ लाख रुपयांची शिल्लक आढळून आली आहे.


 
इंदलसिंग ठाकूर (वय ५२, रा. हनुमानवाडी, ता. चाळीसगाव) हे फाटलेली बनियन, मळकट कपडे अशा अवस्थेत आपल्या हातातील शर्टचे फडके तर कधी झाडूने रेल्वेच्या डब्यात साफसफाई करून प्रवाशांकडे भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवत हाेते. चेहरा हसमुख व नेहमी विविध विषयांवर भाष्य करणारे, गाणे म्हणत मनाेरंजन करणारे ठाकूर हे रेल्वे प्रवास करणाऱ्यांना चांगलेच परिचित हाेते. त्यांची काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी धुळे येथील हिरे मेडिकल रुग्णालयात हलवण्यात आले होते. २९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर याबाबतची माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना देण्यात आल्यानंतर पाेलिसांनी त्यांच्या परिवाराचा शोध घेण्यासाठी त्यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली. त्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चाळीसगाव शाखेचे पासबुक व पोस्टाच्या आरडीच्या पावत्या मिळून आल्या. ते तपासले असता खात्यात तब्बल १२ लाख रुपयांची रोकड आढळून आल्याने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान, इंदलसिंग ठाकूर यांच्या औरंगाबाद येथील नातेवाइकांची माहिती मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.  शेजारचे म्हणाले, बँकेत नित्यनेमाने ये-जा करत

पाेलिसांनी ठाकूर यांच्या घराशेजारी राहणाऱ्यांकडे विचारपूस केली. त्या वेळी ते बऱ्याच वर्षांपासून रेल्वेत साफसफाई करून प्रवाशांकडे भीक मागून उदरनिर्वाह करीत हाेते. या कामातून मिळालेले पैसेे बँकेत जमा करण्यासाठी ते नित्यनेमाने बँकेत जायचे, असे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...