आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत रेल्वे अपघातात वेगवेगळ्या कारणांनी एकाच दिवशी 12 जण ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईत रेल्वे अपघातात एकाच दिवशी (दि. १२) १२ जणांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी मंगळवारी दिली. याबाबत माहिती देताना रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की,  वेगवेगळ्या कारणांनी साेमवारी १२ जणांचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले आहेत. यात रेल्वे रूळ  ओलांडणे, गर्दीतून खाली पडणे, रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकणे आणि आत्महत्या या कारणांचा समावेश आहे.

 

ठाणे आणि कल्याण येथे रेल्वे रुळांवर आल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. वडाळा येथे गर्दीतून खाली पडल्याने  दोन ठार झाले. कुर्ला, मुंबई सेंट्रल आणि बांद्रा येथे तिघांचा प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मध्ये अडकल्याने मृत्यू झाला, तर एकाने डोंबिवली येथे आत्महत्या केली. गेल्यावर्षी वेगवेगळ्या कारणांनी ३  हजार १४ जणांना  रेल्वे अपघातात प्राण गमावावे लागल्याचे माहिती अधिकारात  उघड झाले आहे. दरम्यान, रेल्वेत प्रवास किंवा रुळ ओलांडताना प्रवाश्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...