Home | National | Other State | 12 people died in two accidents in the rajasthan

राजस्थानमध्ये लग्नासाठी निघालेला वरातीचा टेम्पो उलटला, 7 महिलांसह 9 जणांचा मृत्यू...

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 24, 2019, 01:30 PM IST

दुसऱ्या एका अपघातात ट्रकने कारला टक्कर मारली, तीन जणांचा मृत्यू

  • 12 people died in two accidents in the rajasthan

    सवाईमाधोपूर(राजस्थान)- येथील सवाईमाधोपूरमध्ये लग्नाला जाणारा टेम्पो ज्यात अनेक वराती भरलेले होते, तो कँटर शिवाड परिसरात अनियंत्रित होऊन पलटला. रविवारी झालेल्या या अपघातात 9 महिलाचा मृत्यू झाला आहे, ज्यात 2 लहान मुलींचाही समावेश आहे. तर जखमींना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात भर्ती करण्यात आले आहे.

    घटनेनंतर कलेक्टर एस.पी. सिंह यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली आणि मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना 1 लाख आणि गंभीर जखमी झालेल्यांना 20 हजार रूपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. ते म्हणाले की, व्यावसायिक गाड्यांमध्ये अशाप्रकारे अधिक लोक बसवणे चुकीचे आहे. याच्याविरूद्ध कडक करावाई केली जाईल.


    ट्रक आणि कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू
    दुसरी एका घटनेत राजगड-सिकंदरा मेगा हायवेवर ट्रकच्या धडकेत कारमधील आई,मुलगा आणि मुलीचा मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झालेतय घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला आहे.

Trending