आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूचे 12 संकेत : महादेवांनी स्वतः सांगितले होते देवी पार्वतीला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साध्य श्रावण मास सुरु असून धर्मग्रथांमध्ये महादेवाला महाकालसुध्दा म्हटले गेले आहे. महाकालचा अर्थ म्हणजे काळ (मृत्यू ज्याच्या हाती असतो) महादेव जन्मा-मृत्यूपासून मुक्त आहेत. अनेक धर्मग्रथांमध्ये महादेवाला अमर सांगण्यात आले आहे. महादेवाच्या संबंधित अनेक धर्मग्रंथ प्रचलित आहेत. परंतु शिवपुराणाला या ग्रथांमध्ये महत्वाचे मानले गेले आहे. या ग्रथांत महादेवाच्या संबंधित अनेक रहस्यमयी गोष्ट सांगितल्या आहेत. शिवाय, ग्रथांत अशा अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत, ज्या सामान्य लोकांना ठाऊक नाहीयेत. शिवपुणात महादेवाने पार्वतीला मृत्यू संबंधित काही संकेत सांगितले होते. हे संकेत समजून घेतल्यास माहित होते, की कोणत्या व्यक्तीचा मृत्यू कधी होऊ शकतो. महादेवाने पार्वतीला सांगितलेले मृत्यूचे संकेत खालीलप्रमाणे...

1. शिवपुरणानुसार, ज्या मनुष्याला ग्रहांचे दर्शन झाल्यानंतरसुध्दा दिशांचे ज्ञान नसते, मनात अस्वस्थता असते, तर त्या व्यक्तीचा मृत्यू 6 महिन्यांत होतो.

2. ज्या व्यक्तीला अचानक गोमाशा घेरतात, त्यांचे आयुष्य एकच महिना शिल्लक असते, असे मानले जाते.

3- शिवपुणारात महादेवाने सांगितले आहे, की मनुष्याच्या डोक्यावर गिधाड, कावळा किंवा कबुतरा येऊन बसला तर त्या मनुष्याचा एका महिन्यातच मृत्यू होतो.
 

4- जर एखाद्या व्यक्तीचे शरीर अचानक पांढरे किंवा पिवळे पडले आणि लाल निशाण दिसायला लागले तर त्या मनुष्याचा 6 महिन्याच्या आत मृत्यू होतो. ज्या मनुष्याचे तोंड, कान, डोळे आणि जीभ काम करत नसले तर, शिवपुराणानुसार त्याच्या मृत्यू 6 महिन्यांमध्ये होतो.

5- ज्या मनुष्याला चंद्र अथवा सूर्याच्या आसपासचा भाग काळा दिसत असेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू 15 दिवसांत होतो. ज्या मनुष्याला चंद्र आणि चांदण्यास पुसकट दिसत असतील तर त्या व्यक्तीचा मृत्यू एक महिन्यात होतो, असे शिवपुराणात सांगण्यात आले आहे.
 

6- त्रिदोष (वात, पित्त, कफ)मध्ये ज्या व्यक्तीच्या नाकातून पाणी येते, त्याचे आयुष्य केवळ पंधरा दिवसांचे असते. एखाद्या मनुष्याचे तोंड अथवा गळा वारंवार कोरडा पडायला लागला तर त्याचे आयुष्य 6 महिन्यांत संपते, असा संकेत शिवपुराणात देण्यात आला आहे.

7. ज्या व्यक्तीला तेल, पाणी आणि तूपात आपले प्रतिबिंब दिसले नाही तर तो 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ जगू शकत नाही. जर कुणाला आपली सावली डोक्याशिवाय दिसत असेल तर असा मनुष्य एका महिनासुध्दा जिवंत राहू शकत नाही.
 

8. जर एखाद्या मनुष्याचा डावा हात सतत एक आठवडा फडफडत असले तर त्याचा एका महिन्यात मृत्यू होऊ शकतो. जेव्हा सर्व अंग दुखत असेल, आळस आला असेल आणि टाळू कोरडी पडली असेल तर तो व्यक्तीचे केवळ एक महिनाच आयुष्य शिल्लत असते.

9. ज्या व्यक्तीला ध्रुव तारा अथवा सूर्यमंडळाचे दर्शन झाले नाही. रात्री इंद्रधनुष आणि दुपारी चांदण्या दिसल्या किंवा गिधाड आणि कावळ्यांनी घेरले तर त्या व्यक्तीचे आयुष्य 6 महिनेच शिल्लक असते, असे शिवपुराणात सांगण्यात आले आहे.
 

10. ज्या मनुष्याला अचानक सूर्य आणि चंद्र राहूने ग्रस्त दिसेल (सूर्य आणि चंद्र काळे दिसतील) आणि संपूर्ण दिशा फिरताना दिसतील, त्या मनुष्याचा मृत्यू 6 महिन्यांत होतो.
 

11. शिवपुराणानुसार, ज्या व्यक्तीला हरणाच्या शिकारी मागील आवाजसुध्दा ऐकायला येत नसेल तर त्या व्यक्तीचे आयुष्य 6 महिनेच शिल्लक असते. ज्याला आकाशात सप्तर्षि चांदण्या दिसत नसतील तर त्या मनुष्याचे आयुष्य केवळ 6 महिने राहिले असेल संकेत शिव पुराणात दिले आहेत.
 

12. शिवपुराणानुसार, ज्या व्यक्तीला अग्नीचा प्रकाश अंधुक दिसत असेल आणि चौहूबाजूंनी अंधार दिसत असेल तर त्या व्यक्तीचे आयुष्य 6 महिन्यांत संपते.