आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ल्यात 12 दहशतवादी ठार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तान- मजार-ए-शरीफ- अफगाणिस्तानातील उत्तरेकडील बल्ख प्रांतात झालेल्या हवाई हल्ल्यात रविवारी १२ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या कुद्रातुल्ला देखील ठार झाला. 

 

अफगाणिस्तानातील सेनेचा प्रवक्ता मोहंमद हनीफ रेजाई यांनी रविवारी ही माहिती दिली. शोलगारा जिल्ह्यातून मोटारसायकलवरून जाणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटावर हल्ला करण्यात आला होता. त्यात यश मिळाले. 

 

काबूलमध्ये गॅस सिलेंडर स्फोट, ९ जणांचा मृत्यू 
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये गॅस सिलेंडर स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना घडली. आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्ते वहिदुल्ला मयार यांनी ही माहिती दिली. अफगाणिस्तानात थंडीच्या काळातही गॅस सिलेंडरचा स्फोटाच्या घटना घडतात. गेल्या आठवड्यात काबूलमध्ये गॅस स्टेशनवर हल्ला झाला होता. त्यात तीन जणांचा मृत्यू तर ४२ जण जखमी झाले होते. अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवादी संघटनेच्या कारवाया अजूनही सुरू आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...