आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्राद्ध पक्षामध्ये पितरांसाठी पिंडदान केले जाते. सामान्यतः लोकांना एक, दोन प्रकारच्या श्रद्धाविषयी माहिती असेल. पितृ पक्षात केले जाणारे श्राद्ध, एखाद्या मंगलकार्यापूर्वी केले जाणारे श्राद्ध आणि कुंडलीत पितृदोष असेल तर तो दूर करण्यासाठी केले जाणारे श्राद्ध. परंतु आपल्या धर्मग्रंथांमध्ये एक-दोन नाही तर 12 प्रकारचे श्राद्ध सांगण्यात आले आहेत. निर्णय सिंधूमध्ये 12 प्रकारच्या श्राद्धाचा उल्लेख आढळून येतो.
नित्य श्राद्ध : कोणताही व्यक्ती, अन्न, जल, दूध, कुश, पुष्प आणि फळाने दररोज श्राद्ध करून पितरांना प्रसन्न करू शकतो.
नैमित्तक श्राद्ध- हे श्राद्ध विशेष निमित्ताने केले जाते. उदा. पिता, किंवा एखाद्या मृत्यूच्या तिथीच्या दिवशी याला एकोद्दिष्ट म्हटले जाते. यामध्ये विश्वदेवाचे पूजन केले जात नाही, केवळ एक पीडनदान केले जाते.
काम्य श्राद्धः एखाद्या विशेष इच्छापूर्तीसाठी हे श्राद्ध केले जाते. उदा. पुत्र, धनादि प्राप्तीसाठी.
वृद्धी श्राद्ध : हे श्राद्ध सौभाग्य वृद्धीसाठी केले जाते.
सपिंडन श्राद्ध- मृत व्यक्तीच्या 12 व्या दिवशी पितरांना भेटण्यासाठी केले जाते. हे श्राद्ध स्त्रियासुद्धा करू शकतात.
पार्वण श्राद्ध : वडील, आजोबा, पंजोबा, आजी, पणजीसाठी हे श्राद्ध केले जाते.
गोष्ठी श्राद्ध : हे श्राद्ध कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र असण्याच्या वेळी केले जाते.
कर्मांग श्राद्ध : हे श्राद्ध एखाद्या संस्कार निमित्ताने केले जाते.
शुद्धयर्थ श्राद्ध : हे श्राद्ध कुटुंबाच्या शुद्धीसाठी केले जाते.
तीर्थ श्राद्ध : हे श्राद्ध तीर्थयात्रेला गेल्यामुळे केले जाते.
यात्रार्थ श्राद्ध : हे श्राद्ध यात्रा यशस्वी होण्यासाठी केले जाते.
पुष्टयर्थ श्राद्धः शरीर स्वास्थ्य आणि सुख-समृद्धीसाठी त्रयोदशी तिथी, मघा नक्षत्र, वर्षा ऋतू, भाद्रपद मासातील कृष्ण पक्ष या श्राद्धासाठी उत्तम मानला जातो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.