आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२ वर्षीय ब्यूटी ब्लॉगरने खरेदी केली लक्झरी कार; वयाच्या चौथ्या वर्षापासून करते मेकअप, सोशल मीडियावर १० लाखांपेक्षा जास्त फाॅलाेअर्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक - थायलंडमधील नॅथनन सनुनरात ही केवळ वयाच्या १२ व्या वर्षीच नामांकित ब्यूटी ब्लॉगर बनली असून, गत महिन्यात तिने तिच्या १२ व्या वाढदिवशी आवडीची लक्झरी कार खरेदी केली. तथापि, ही कार ती चालवू शकत नाही. कार चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी तिला ८ वर्षे प्रतीक्षा करावी लागेल. सोशल मीडियावर १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या नॅथननने स्वत:ला बीएमडब्ल्यू-७ सिरीजची कार भेट दिली. ही कार दीड लाख पाैंड म्हणजे सुमारे एक काेटी ३३ लाख रुपयांची आहे.

 
चोनबुरी राज्यात राहणाऱ्या नॅथननने सांगितले की, माझे पाय कारच्या पॅडलपर्यंत पाय पाेहाेचू शकत नाहीत. त्यामुळे वाहन चालवण्याचा परवाना मिळेल तेव्हाच मी माझ्या स्वप्नातील कार चालवण्याचे स्वप्न पूर्ण करेल. ताेपर्यंत माझे आई-वडील ती चालवतील.

 

लंडन फॅशन वीकमध्येही केलाय मॉडेल्सचा मेकअप
नॅथननने ती ३ वर्षांची असतानाच पहिल्यांदा मेकअप ब्रश हाती घेतला हाेता व ४ वर्षांची असताना तिचा पहिला यू-ट्यूब व्हिडिअो आला. तेव्हापासून ती ऑनलाइन मेकअप सेलिब्रिटी बनलीय. अाता ती अनेक फॅशन इव्हेंट्समध्ये सहभागी हाेते व शाळेतही जाते. गतवर्षी लंडन फॅशन वीकमध्येही सहभागी हाेऊन तिने अनेक माॅडेल्सचा मेकअप केला हाेता.

 

आई म्हणाली- आम्हाला तिचा अभिमान वाटताे

नॅथननने सांगितले की, मी चार वर्षांची हाेते तेव्हापासून दररोज मेकअप करतेय. तेव्हाच मी माझा पहिला मेकअप ट्यूटोरियल व्हिडिओ यू-ट्यूबवर पोस्ट केला हाेता. मला मेकअप करणे खूप आवडते. त्यामुळेच मी मेकअप आर्टिस्ट बनण्याचे स्वप्न पाहिले. मी प्रत्येक प्रकारचा लूक वापरू इच्छिते. नैसर्गिक,  फॅन्सी व स्पेशल इफेक्टसदेखील. गतवर्षी लंडन फॅशन वीकमध्ये सहभागी हाेण्याची संधी मिळणे माझ्यासाठी जॅकपॉटच हाेता. मी तेथे मुले व माेठ्या मॉडेल्सचा मेकअप केला व खूप काही शिकले. यू-ट्यूबवर झाले लाखाे फॉलोअर्स आहेत. तसे मला बीएमडब्ल्यूची कार खूप आवडते. मात्र, माेठी झाल्यावर एके दिवशी पोर्शे कार खरेदी करण्याची इच्छा आहे. नॅथननची आई नाचाने सांगितले की, आम्ही तिला तिच्या कामासाठी नेहमीच प्राेत्साहन देताे. ती खूप समंजस असून, आम्हाला तिचा अभिमान वाटताे. कारण तिच्यामुळेच लाेक आम्हाला अाेळखू लागले आहेत.

बातम्या आणखी आहेत...