आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉलमधील एस्केलेटरमध्ये अडखळून दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला 12 वर्षीय मुलगा, जागीच झाला मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची(झारखंड)- येथील न्यूक्लिअस मॉलमध्ये शनिवारी सायंकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आपल्या नातेवाईकांसोबत मॉलमध्ये फिरण्यासाठी आलेल्या एका 12 वर्षाचा मुलगा एस्केलेटर (स्वयंचलित पायरी) वरून जात असतानात अडखळून खाली पडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मुलाचे नाव पार्थिव साह असून तो ब्रिजफोर्ड शाळेत सहाव्या वर्गात शिकत होता. पार्थिवची आई दुर्गा पोलिस विभागात मानवी तस्करी विरोधी विभागात पोलिस असून वडील राजकूमार नेव्हीमधून सेवा निवृत्त अधिकारी आहेत. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी रूग्णालयात धाव घेतली. न्यूक्लिअस मॉलमध्ये जागोजागी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे. तसेच, पोलिस अधिक्षक अजीत कुमार विमल घटनेची माहिती गोळा करून पुढील तपास करत आहेत.

 

खाली उभ्या असलेल्या माणसाच्या खांद्यावर पडला पार्थिव
प्रत्यक्षदर्शिनुसार, पार्थिव सायंकाळी 6.15 वाजता एस्केलेटरला लागून असलेल्या लोखंडी रेलिंगवर खेळत होता. त्यामुळे एका महिला सुरक्षा रक्षकाने त्याला मागे जायला सांगितले. तेव्हा कुटुंबाने सुरक्षा रक्षकाला आम्ही त्याला बाजूला घेऊन जात आहोत असे सांगितले. पण यादरम्यान पार्थिवचा एक हात रेलिंगवरून निसटला आणि सरळ तळमजल्यावर ऊभा असलेल्या एका तरूणाच्या खांद्यावर पडला. त्यानंतर त्याचे डोके जमिनीवर आदळले. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला तत्काळ रूग्णालयात दाखल केले. पण त्यापूर्वीच पार्थिवचा मृत्यू झाला होता. अधिक रक्त गेल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.