आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
झज्जर(हरियाणा)- 27 डिसेंबरपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह 2 जानेवारीला मिळाला. पोलिसांना संशय आहे की, एकापेक्ष जास्त लोकांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गँगरेपनंर खून केल्याचे सांगितले जात आहे. एसएमओ डॉ. संजय सचदेवा यांनी सांगितले की, मुलीच्या प्रायव्हेट पार्टलाही वाईट पद्धतीने दुखापत करण्यात आली आहे. त्यासोबतच तिच्या गळ्यावर आणि डोक्यावर जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत.
पोलिसांसाठी हे प्रकरण खुपच गुंतागुंतीचे बनले आहे. त्यांनी या प्रकरणात मुलीच्या नात्यामधील एका मुलाचे नाव घेतल आहे, जो 27 डिसेंबरपासून बेपत्ता आहे. त्यामुळेच पोलिसांनी त्या मुलावर संशय आहे. हैराण करणारी बाब म्हणजे ज्या दिवशी मुलगी वीट भट्टीपासून गायब झाली त्यादिवशी कुटुंबीयांनी तिचा खुप शोध घेतला पण ती सापडली नाही आणि 6 दिवसानंर त्याच ठिकाणी झाडांमध्ये तिचा मृतदेह आढळून आला.
मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर होत्या जखमा
डीएसपी हंसराज यांचे म्हणने आहे की, पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये अजून काहीच स्पष्ट झालेले नाहीये. खून कशा पद्धतीने झाला आहे याची माहिती त्यात मिळली नाहीये, त्यामुळे बिसराच्या रिपोर्टची वाट पोलिस पाहत आहेत. येणाऱ्या रिपोर्टमध्ये जे तथ्य समोर येतील त्या आधारे पोलिस पुढील कारवाई करताली.
पोलिस ठाण्यात 28 डिसेंबरलाच दाखल केली होती तक्रार, पण कोणतीही कारवाई झाली नाही
उत्तरप्रदेशमधून एक मजुर आपल्या कुटुंबासोबत 24 डिसेंबरला मजुरी करण्यासाठी सिलानी गावातील वीट भट्टीवर आला होता. तीन दिवसानंतर त्याची मुलगी बेपत्ता झाली. त्यानंतर 28 डिसेंबरला त्याने पोलिसांत याची तक्रार दाखल केली आणि स्वत ही मुलीचा शोध घेण्यासाठी गेला. त्यानंतर सहा दिवसानंतर म्हणजे 2 जानेवारीला मुलीचा मृतदेह वीट भट्टी जवळ असलेल्या झाडात सापडला. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता आणि त्याला जनावरांकडून छिन्न विछीन्न करण्यात आले होते.
यूपीच्या अनेक शहरात मुलाचा शोध
या प्रकरणात मुलीचा एका 16 वर्षीय मुलावर सगळ्याचा संशय आहे, कारण तो त्यांच्यासोबत वीट भट्टीवर आला होता आणि 27 डिसेंबरपासून बेपत्ता आहे. पोलिसांनी यूपीच्या अनेक शहरात त्याचा शोध सुरू केला आहे. त्याचा फोटो देखील पोलिसांनी जागोजागी लावले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.