आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीमध्ये 120 रुपये खरेदी, बाजारामध्ये 60-80 दराने विक्री

2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

पैठण : महाराष्ट्रात कांद्याने डोळ्यांना पाणी आणले असले तरी पैठण तालुक्यातील ग्रामीण बाजारपेठेत मात्र कांद्याचे दर आवाक्यात असून कांदा ६० ते ८० रुपये किलोने मिळत आहे. कांद्याची आवक बाजार समितीत कमी असली तरी खरेदी १२० रुपये दराने होत आहे. यात जुन्या कांद्याला १२० चा, तर नवीन कांद्याला ९५ रुपयांचा दर मिळत असून, लाल कांद्याला पश्चिम महाराष्ट्र जास्त भाव मिळत असल्याने तिकडे विक्रीसाठी शेतकरी घेऊन जात असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नितीन विखे यांनी दिली. दर आवाक्यात ठेवण्यासाठी सध्या बाजारात जुना व डॅमेज कांदा विक्रीसाठी असून ताे आकाराने लहान व दुभागलेला, तर काही आत ओलीने सडलेला असल्याचे दिसून येते.

परतीच्या पावसाने कांद्याची रोपे वाया गेल्याने कांद्याची लागवड कमी झाली. यात सध्या साठवणूक केलेल्या कांद्याला ग्रामीण बाजारात भाव मिळत आहे. या वर्षे अखेर पहिल्यांदाच पैठण बाजार समितीत कांद्याला प्रतिकिलो १२० रुपयांचा भाव मिळत असला तरी आवक केवळ काही गोण्यांत होत असल्याने लहान कांदा हा शेतकरी स्वत: बाजारात विक्री करत असल्याने त्याचे दर मात्र ६० ते ८० रुपयांच्या घरातच असल्याने ग्रामीण भागात तरी कांद्याने डोळ्यांत पाणी आणले नाही. शासनाने कांदा आयातीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचे पडसाद ग्रामीण बाजारपेठेवर होत आहेत. आठ दिवसांपूर्वी कांदा २०० रुपये किलोच्या जवळपास भावाने विक्री होत होता. आज शासनाच्या आयात धोरणामुळे कांद्याचेे दर कोसळत आहेत. यंदा कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दराने उसळी घेत प्रतिकिलो दीडशे रुपयांच्या वर भाव कांद्याने घेतला. या वर्षातील हा विक्रमी भाव बाजार समितीत मिळाला. मात्र, आवक कमी असल्याचे हा कांदा बाहेर चांगला भाव खाऊन जात असतानाच किरकोळ बाजारात जुना व डॅमेज कांदा ६० ते ८० च्या घरात विकला जात आहे.

शासनाने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला यातून आपल्याकडील कांद्याचे भाव कमी होणे अपेक्षित होते. मात्र, निर्यातीच्या धोरणाचा उलटा परिणाम स्थानिक पातळीवर झाला आहे. बाजार समितीपेक्षा किरकोळ बाजारात भाव कमी होण्याऐवजी त्यात वाढ होत असल्याचे कांदा विक्रेते राहुल पाटणी यांनी सांगितले.

पैठणला ६० ते ८० रुपये किलोचा नगरचा डॅमेज कांदा

पैठण तालुक्यात जो स्वस्त कांदा मिळत आहे तो नगर जिल्ह्यातून आणला जातो. नगरचा चांगला व लाल कांदा हा मुंबई, पुणे सारख्या शहरात पाठवला जातो. त्याला चांगला भाव मिळतो. मात्र, यातून जो छाटून कांदा काढला जातो तो ग्रामीण भागात कमी दराने व्यापारी घेतात. हाच कांदा पैठण सारख्या ठिकाणी ६० ते ८० रुपये किलोने उपलब्ध होत असला तरी हा कांदा दुभाळका, आकाराने लहान, खराब, डॅमेज झालेला असल्याचे बाजार समितीचे सचिव नितीन विखे यांनी सांगितले.

आवक वाढल्याने दर कमी होतील

सध्या पैठणमध्ये कांद्याची आवक कमी असल्याने भाव शंभर रुपयांच्या पुढे किलोला मिळत आहे. मात्र, आता इतर देशातून आवक होत असल्याने हे भाव आणखी कमी होतील. -नितीन विखे, सचिव बाजार समिती, पैठण.
 

बातम्या आणखी आहेत...