आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोपेनहेन- डेनमार्कच्या उत्तर पश्चिममध्ये असलेल्या जटलँड समुद्री किनाऱ्यावरील रबजर्ग न्यूडे लाइट हाउस पर्यटकांसाठी शनिवारी रात्री सुरू करण्यात आले. समुद्राच्या लाटांमुळे या 120 वर्षे जुने आणि 1000 टन वजनाच्या लाइट हाउसला नुकसान होत होते. त्यामुळे, मागच्या महिन्यात याला समुद्र किनाऱ्यापासून 262 फुट दूर शिफ्ट केले होते. 1968 मध्ये या लाइट हाउसला म्यूजियम करण्यात आले. तेव्हापासून दरवर्षी 2.50 लाक पर्यटक याहा पाहण्यास येतात.
लाइट हाऊस हलवण्याच्या प्रक्रियेत रेल्वे पटऱ्या, जेसीबी आणि रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. याला हलवण्यासाठी अंदाजे 5.8 लाख पाउंड(5.28 कोटी रुपये) खर्च आला.
जटलँडचे महापौर अर्ने बोल्तेने सांगितले की, हे लाइट हाउस 76 फुट उंच आहे. याला 1900 मध्ये समुद्र किनाऱ्यापासून 660 फुट दूर बनवण्यात आले होते, पण माती सरकत असल्याकारणाने समुद्राचे पाणी लाइट हाउसपर्यंत पोहचू लागले. समुद्राच्या पाण्यामुळे हे एतिहासिक वास्तू पडण्याची भीती होती, त्यामुळे याला शिफ्ट करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.