आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यासाठी घोषणा १२५ कोटींची, यादी २०० कोटींची ...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दोन वर्षांपूर्वी (२७ जून २०१७) राज्य शासनाने महापालिकेला १०० कोटी रुपये दिले तेव्हा १५० कोटींच्या रस्त्यांची यादी तयार करण्यात आली होती. ३ जानेवारीला औरंगाबादेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी १२५ कोटी देण्याचे जाहीर केले, तर आता प्रशासनाने थेट २०० कोटींच्या रस्त्यांची यादी तयार केल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर ही यादी मान्यतेसाठी सादर केली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. 


शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने राज्य सरकारने २०१४ मध्ये २४ कोटी, तर २०१७ मध्ये १०० कोटी रुपये महापालिकेला दिले होते. ३ जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १०० कोटींच्या रस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी १२५ कोटींचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी निधी जाहीर करताच महापौरांनी दुसऱ्याच दिवशी बैठक घेऊन यादी तयार करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्थायी समिती सभापती व सभागृह नेत्याने स्वतंत्र बैठक घेतली. त्यावर भाजपच्या उपमहापौरांनी आक्षेप घेतला. दरम्यान, आयुक्तांनी शनिवारी प्रशासनामार्फत यादी तयार करण्याचे आदेश दिले. सोमवारी ही यादी आयुक्तांकडे सादर करण्यात आली. या यादीनुसार २०० कोटींचा निधी लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. अर्थात, सर्वसाधारण सभा त्यावर शिक्कामोर्तब करेल. 

बातम्या आणखी आहेत...