आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२५ स्कूल बसची तपासणी, ५० चालकांना मेमो, २० बसेस जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- धावत्या स्कूल बसमधून पडल्यामुळे दोन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली होती. शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र सुरू झाले तरी ६३५ पेक्षा जास्त स्कूल बस आणि खासगी वाहने फिटनेस चाचणीविना धावत असल्याचे alt147दिव्य मराठी' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत समोर आले. शेळ्या-मेंढ्यांप्रमाणे वाहनांत कांेबून विद्यार्थ्यांची ने-आण होत असल्याचे वृत्त ५ डिसेंबर रोजी प्रकाशित होताच आरटीओ प्रशासन खडबडून जागे झाले. शुक्रवारी पहाटे ६ ते सकाळी ९ पर्यंत तीन तास ३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चार पथकांनी विविध मार्गांवर १२५ स्कूल बसची तपासणी केली. त्यापैकी ५० स्कूल बसचालक नियमांचे पालन करत नसल्याने त्यांना मेमो देण्यात आले. तसेच २० स्कूल बसेस जप्तही करण्यात आल्या. मोटार वाहन कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे मे महिन्यातच स्कूल बस, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांची नोंदणी आणि फिटनेस तपासणी होणे अनिवार्य आहे. याचबरोबर प्रत्येक शाळेत परिवहन समिती गठीत करणे व विद्यार्थी सुरक्षेबाबत संनियंत्रण अंमलबजावणी व्हायला हवी. मात्र, शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत बेफिकीर असल्याचे समोर आले होते. 


विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे वेधले लक्ष : शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र सुरू झाले तरी बहुतांश शाळांत परिवहन समिती स्थापन केलेली नाही. ६३५ पेक्षा अधिक स्कूल बसची फिटनेस तपासणी करण्यात आलेली नाही. कालबाह्य वाहनांतून अवैधरीत्या विद्यार्थ्यांची ने-आण केली जात असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राइट टू एज्युकेशन अॅक्टनुसार शाळांमध्ये मोफत व सक्तीचे शिक्षण दिले जातेय. त्याच धर्तीवर शालेय विद्यार्थी सुरक्षेसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, याकडे alt147दिव्य मराठी'ने वृत्तातून लक्ष वेधले होते. त्याची आरटीओ प्रशासनाला दखल घ्यावी लागली. 


मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करणार 
शुक्रवारी पहाटेपासूनच एकाच वेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक यांच्यासह एकूण ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चार पथकांनी विविध मार्गांवर स्कूल बस तपासणी मोहीम राबवली. यात नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या स्कूल बसचालकांना मेमो देण्यात आला. तसेच २० स्कूल बस जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 
 

बातम्या आणखी आहेत...