आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामथुरा- देशाच्या हवाई दलासाठी १२६ विमानांची गरज होती तर मग केवळ ३६ राफेलची खरेदी का करण्यात आली ? असा प्रश्न काँग्रेसने नरेंद्र मोदी सरकारला विचारला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना हा प्रश्न उपस्थित केला.
चतुर्वेदी म्हणाल्या, राफेल खरेदीची एवढी घाई का होती ? एकदमच सर्व विमानांचा पुरवठा करण्याबद्दल सरकारने फ्रेंच कंपनीला का बरे विचारणा केली नाही ? २०१९ मध्ये अनेक विमानांची खेप उपलब्ध होणार आहे. त्यानंतर उर्वरित २०२२ मध्ये मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. खरे तर २०१९ मध्येच सर्वच्या सर्व विमानांचा पुरवठा फ्रान्स कंपनीने करायला हवा होता. तसे झाले नाही. कारण सरकारला संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीची धास्ती होती असे त्या म्हणाल्या. दरम्यान, लढाऊ विमानांच्या करारात प्रत्येक विमान पूर्वीच्या सरकारच्या तुलनेत २० टक्क्यांनी स्वस्त खरेदी केली. असा दावा अरूण जेटली यांनी केला होता.
'राष्ट्राचे हितसंबंध अब्जाधीश मित्रांच्या दावणीला' : मोदी सरकारने राष्ट्रहिताला फार महत्त्व दिलेले नाही. राफेल सौदा करताना अब्जाधीश मित्रांच्या दावणीला राष्ट्रहित बांधले आहे. हेच एकूण व्यवहारावरून दिसून येत आहे. प्रत्येक विमानाची किंमत ५२६ कोटींवरून १ हजार ६७० कोटींवर पोहोचली ? पंतप्रधानांनी त्याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. सौदा करताना ७० वर्षांचा अनुभव असलेल्या कंपनीला डावलून १२ वर्षांपूर्वीच्या कंपनीला हे कंत्राट का दिले गेले, असे चतुर्वेदी यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.