आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्गात हसत होती 12 वीची विद्यार्थिनी, प्रिंसिपलने रागवून काढले बाहेर; मनाला लागली ही गोष्ट तर मुलीने उचलले हे पाऊल, शाळा प्रशासनही झाले हैराण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सीकर (राजस्थान) : नेहरू पार्क येथील एक्सीलेंस शाळेत 12 वीच्या विद्यार्थीनीचा शाळेच्या चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे मृत्यू झाला. वर्गात हसल्यामुळे प्रिंसिपलने तिला वर्गाबाहेर काढले होते. याचा राग आल्याने मुलीने हे पाऊल उचलले. विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले तर तिची हत्या केल्याचा कुटुंबीयांनी आरोप केला आहे. 

 

प्रिंसिपलने रागवल्यामुळे उचलले हे पाऊल

शाळा व्यवस्थापनाने सांगितले की, गुरुवारी सकाळी शिल्लक तासिका सुरू होती. 12 वी कला शाखेची 18 वर्षीय दिक्षा वर्ग सुरु असताना हसत होती. प्रिंसिपल तिला रागावले आणि तिच्या घरच्यांना फोन करून तिला वर्गाबाहेर काढले. त्यानंतर दिक्षा टॉयलेटला जाण्याचा बहाणा करत इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेली. तेथे काही वेळ थांबून तिने उडी घेतली असता तिचा जागेवरच मृत्यू झाला. घटेनेची माहिती मिळताच कुटुंबीय तिथे दाखल झाले. पण त्यांनी रात्री उशीरापर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केल्याचा त्यांनी आरोप केला. अखेर पोलिस आणि शाळा प्रशासनाने त्यांची समजूत काढल्यानंतर दिक्षाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आला. कुटुंबीयांनी दिक्षाची बॅग तपासली असता त्यात काही सापडले नाही. याबाबत एसडीएम गरिमा लाटा, सीकरचे तहसीलदार जगदेव शर्मा, सिटी सिओ गिरधारीलाल शर्मा, शाळेच्या प्राचार्या विनिती शर्मासह इतर विद्यार्थी आणइ शिक्षकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. दिक्षा वर्गात हसत होती यामुळे तिच्या कुटुंबीयांना फोन केला असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

 


शाळा प्रशासनाने दीड तास मुलीच्या मृत्यूबाबत सांगितले नाही - दिक्षाचे वडील

दिक्षाच्या वडिल नरेश माथुर यांनी सांगितले की, सकाळी 10 वाजता आम्हाला शाळेतून फोन आला. वर्गात शिकवत असतना तुमची मुलगी हसत असल्यामुळे मी तिला वर्गाबाहेर काढत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत आम्ही त्यांची माफी देखील मागितली. नरेश माथुर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शाळा प्रशासनाने जवळपास 12 वाजता पुन्हा फोन केला. तुमची मुलगी पडली असून तिला दुखापत झाली आहे. तुम्ही शाळेत या असे आम्हाला सांगितले. मी 1.30 तास शाळेत थांबलो होतो पण मला कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर मुलीला रूग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. रूग्णालयात गेलो असता दिक्षा तेथे नव्हती. मग शाळेत परत आल्यावर माझ्या मुलीचा मृत्यू झाला असल्याचे मला सांगितले. माझ्या मुलीसोबत चुकीची वर्तवणुक करण्यात आली असून तिचा खून करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...