Home | National | Madhya Pradesh | 12th class student found dead in mysterious way

रूममध्ये आढळला एकुलत्या एक मुलाचा मृतदेह, कपड्याने बांधले होते पाय अन् कॅरिबॅगने झाकला होता चेहरा...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 02:47 PM IST

मृतदेहाजवळ पावडर असलेला स्टीलचा ग्लासही आढळला

 • 12th class student found dead in mysterious way

  भोपाळ- मदर टेरेसा स्कूलमध्ये भव्य हा 12वीत शिकत होता. गुरूवारी दुपारी तो स्कूलमधून घरी आला, त्यावेळी घरी कोणीच नव्हते. कीरायदारदेखील बाहेर गेलेले होते. संध्याकाळी कीरादार आणि त्याची आई आली तेव्हा त्यांनी दार ठोठावले पण दार उघडले नाही, त्यानंतर त्यांनी दार तोडले आणि आत आले. समोरचे दृष्य पाहून त्यांना धक्का बसला. भव्य पंलगावर पडला होता, त्याचे पाय बांधलेले होते आणि चेहरा कॅरिबॅगने झाकलेला होता.


  - एसपी राहुल लोढा यांनी सांगितले की, मृतदेहाला शवविछ्चेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक चाचणीत ही आत्महत्या वाटत आहे पण आम्ही सगळ्या दृष्टीने विचार करतोय.


  मृतदेहाजवळ पाउडर असलेला स्टीलचा ग्लास मिळाला
  - भव्यच्या मृतदेहाजवळ स्टीलचा एक ग्लास मिळाला आहे ज्याच्या आतुन पिवळ्या रंगाचे पाउडर लागलेले आहे. पोलिसांनी तो ग्लास फॉरेंसिक डिपार्टमेंटकडे पाठवला आहे.


  यामुळे भव्यच्या मृत्युवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

  - भव्यचे पाय कपड्याने बांधलेले होते पण गाठ समोरून होती.
  - चेहऱ्यावर कॅरिबॅग गुंडाळलेली होती.
  - पलंगावर कोणत्याही हालचालीचे निशान नाहीत.
  - घर आतुन बंद होते.
  - स्टीलच्या ग्लासमध्ये काय होते जे भव्यने पिले होते.

Trending