आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाचा खर्च पेलवत नाही म्हणून नांदेडमध्ये 12 ‍वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- शिक्षणाचा खर्च झेपत नाही म्हणून शहरात एका 12 वीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अनुजा कांबळे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, अनुजा कांबळे ही दीपनगर भागात आपल्या आईसोबत राहात होती. दोन वर्षांपूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. शहरातील शिवाजी महाविद्यालयात इयत्ता 12 वीत शिकत होती. परंतु शिक्षणाचा खर्च तिला झेपत नव्हता. यातून अनुजाने शुक्रवारी (ता.11) दुपारी घरात कोणीही नसताना गळफास लावून घेतला. सायंकाळी आई घरी आल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली.

 

सापडली सुसाइडनोट
अनुजाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून शिक्षणाचा खर्च झेपत नाही, त्यामुळे आत्महत्या करत आहे. असा उल्लेख अनुजाने चिठ्ठीत लिहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...