आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 12th Pass Woman In Pune Discovers 2 Bugs In Samsung, Company Announces $ 1,000 Prize

पुण्यातील 12 वी पास महिलेने सँमसंगमध्ये शोधले 2 बग्स, कंपनीकडून 1 हजार डॉलरचे बक्षीस जाहीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याआधी फेसबूकमध्येही बग्स शोधले आहेत

आनंद मोहरीर

पुणे- तुम्हाला 'बग' म्हणजे काय माहित आहे का...? आपण बऱ्याच वेळा 'बग' हा शब्द ऐकला आहे. एखाद्या सॉफ्टवेअर प्रोग्राममधील त्रुटी किंवा चूकीला बग म्हणतात. हीच त्रुटी सँमसंग कंपनीच्या वेबसाइटमध्ये निघाली आहे. पुण्यातील विजेता पिल्लई या 12 वी पास महिलेने एक नव्हे तर दोन-दोन बग शोधून काढले आहेत. यासाठी कंपनीकडून त्यांना 1 हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे.

असा शोधून काढला सॅमसंग आणि फेसबूकचा बग...
 
पुण्यातील एका रिअलइस्टेट कंपनीत काम करणाऱ्या विजेता पिल्लई यांनी सँमसंग कंपनीच्या वेबसाइटमध्ये दोन बग्स शोधले आहेत. आयटी क्षेत्राचे शिक्षण न घेतलेल्या, तंत्रज्ञानाची फारसी माहिती नसलेल्या विजेता यांनी सँमसंगच्या 'डिस्पे सोल्यूशन' या साइटमध्ये बग शोधले. दिव्य मराठीने त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी याबाबत माहिती दिली. विजेता पिल्लई म्हणाल्या की, "सॅमसंगच्या डिस्प्ले सोल्यूशन वेबसाइटमध्ये ओटीपी न टाकता लॉग इन करता येत होते. मूळात ही वेबसाइट सॅमसंगच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. या बगमुळे त्यांची सुरक्षित माहिती लीक होण्याची भीती होती. त्यामुळेच मी 24 नोव्हेंबरला संपूर्ण प्रोससचा व्हिडिओ बनवून 25 नोव्हेंबरला तो कंपनीला पाठवला त्यानंतर 4 डिसेंबरला कंपनीकडून रिप्लाय आला आणि त्यांना आपली चूक समजली."

आयटी क्षेत्रातील मित्रांकडून घ्यायची तंत्रज्ञानाची माहिती
 
आयटी क्षेत्राची काहीच माहिती नसलेल्या विजेता पिल्लई या रिअलइस्टेट क्षेत्रात काम करतात. त्यांचे काही मित्र आयटी क्षेत्रातील असल्याने त्यांच्याकडून विजेता यांना तंत्रज्ञानाची थोडीफार माहिती मिळायची. त्यानंतर याबद्दल आवड निर्माण झाली आणि हे बग शोधण्याचे काम सुरू झाले. विजेता यांची बग शोधण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही त्यांनी नामांकित अशा फेसबूकमध्येही बग शोधला आहे. 'फेसबुक'च्या वर्कप्लेस'मध्ये त्रुटी शोधणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला आहेत.

कोण आहे विजेता पिल्लई?
 
विजेता पिल्लई या पुण्यात राहतात. विजेता यांनी 12 वी पर्यंतचे शिक्षण हुतात्मा राजगुरु विद्यालयात घेतले. मात्र, त्यांना परिस्थितीमुळे पदवी पूर्ण करता आली नाही. सध्या त्या पुण्यात खासगी नोकरी करतात. पितृछत्र हरपल्यानंतर आईनेच त्यांना मोठं केलं. फेसबुकने जाहीर केलेले बक्षिस त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. भविष्यातही त्या तंत्रज्ञानातील अशाच त्रुटी शोधणार आहे.
 

बातम्या आणखी आहेत...