आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर, दुपारी 1 वाजल्यापासून 'या' संकेतस्थळावरून विद्यार्थी पाहु शकतील आपला निकाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी निकाल उद्या म्हणजेच (28 मे) रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येईल. मागील काही दिवसांपासून बारावीचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती. दरम्यान, बोर्डाने विद्यार्थ्यांची उत्सुकता जास्त ताणून न धरता निकालाची तारीख जाहीर केली आहे.

 

बारावी परीक्षेला राज्याच्या 9 विभागांतून जवळपास 17 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 3 लाख 83 हजार विद्यार्थी हे मुंबई विभागातील आहे.

 

'या' संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार 

http://mahresult.nic.in
www.mahresult.nic.in
ww.resul.mkcl.org
www.maharashtraeducation.com


एसएमएसवर निकाल
बीएसएनएल मोबाइलधारकांना एसएमएसवर निकाल पाहता येणार आहे. यासाठी त्यांनी MHHSC असा एसएमएस 57766 वर पाठवावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...