आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13% क्रूड महाग, पेट्रोल-डिझेल दर वाढू शकतात; ब्रेंट क्रूड दर ६० डॉलर प्रति पिंप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गेल्या वर्षअखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत मोठ्या घसरणीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाल्याने लोकांना बराच दिलासा मिळाला होता. मात्र, आता त्यांना पुन्हा खिसा ढिला करावा लागणार आहे. नव्या वर्षात कच्च्या तेलाच्या दरात तेजी कायम आहे. आता पुन्हा एकदा ब्रेंट क्रूडच्या दरात ६० डॉलर प्रति पिंपाच्या स्तरास स्पर्श केला आहे. 

 

नवीन वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड आतापर्यंतच्या सुमारे १३% वाढले आहे. गेल्या महिन्यात २८ डिसेंबरला हे ५३.२१ डॉलर प्रति पिंपावर आले होते. २५ डिसेंबरला हे ५०.७७ डॉलर प्रति पिंपापर्यंत खाली आले होते. याच पद्धतीने एका पंधरवाड्यात दर जवळपास १० डॉलर तेजीत आले. एंजेल कमोडिटीचे डेप्युटी व्हाइस प्रेसिडेंट अनुज गुप्ता यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उताराचा परिणाम भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात दहा दिवसांपासून दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात येणाऱ्या तेजीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते. 

बातम्या आणखी आहेत...