आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या 13 नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, 'मला गृहमंत्रिपद हवंय'; जितेंद्र आव्हाडांची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजित पवारांनी सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

मुंबई- आज ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. यात अजित पवारांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदा माळ पडली. तर राष्ट्रवादीचे नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह 13 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीपूर्वी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी गृहमंत्रिपद मिळण्याची आपेक्षा केली आहे.माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले की, "मी गेल्या 32 वर्षांपासून शरद पवारांसोबत काम करत आहे. आजच्या राजकीय परिस्थितीचा विचार करताना सगळे मोठे पोर, सर्व साखर कारखानदार, सर्व मोठी लोक आजूबाजूला असताना सर्वसामान्य परिस्थितीतून येथे येताना पवारांनी हाताला चालवले, त्याबद्दल मी त्यांचा कायम उपकृत राहील.""मी माझ्या नेत्याशी विचारांशी फार प्रामाणिक आहे. दुरावा मधील ‘दु’ सुद्धा माझ्या विचारात येत नाही. त्यामुळे मी यावर बोलणार नाही.शरद पवारांचा फोन हे म्हणजे माझे हार्टबीट वाढण्यासारखे आहे. समोरुन ते काय बोलतील याचा अंदाज नसतो. त्याच्याविषयीचा भितीयुक्त आदर हे माझ्या जीवनाच्या यशाचे गमक आहे. त्यामुळे मी फार कमी वेळा चुकतो किंवा अडचणीत येतो. आयुष्यात फक्त दोन वेळा ते रागवले आहेत. गेल्या 32 वर्षात ते माझ्यावर कधीही रागावलं आहेत याचा आनंद आहे. मी जो काही आहे तो कार्यकर्त्यांमुळेच आहे. प्रत्येक कार्यकर्ता घराघरात गेला म्हणून मी जिंकलो. कार्यकर्ता आहे म्हणून मी आहे," असे मत आव्हाडांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...