जम्मू : किश्तवरमध्ये / जम्मू : किश्तवरमध्ये मिनीबस अपघातात 13 प्रवासी ठार, चिनाब नदीच्या दरीत कोसळली बस

दिव्य मराठी वेब टीम

Sep 14,2018 03:52:00 PM IST

जम्मू - किश्तवर जिल्ह्यात मिनीबस कोसळून झालेल्या अपघातात 13 प्रवासी ठार झाले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असलेली मिनिबस रस्त्याच्या खाली उतरली आणि थेट चिनाब नदीच्या दरीत कोसळली. ठाकरियाच्या जवळ हा अपघात झाला.

प्रवाशांना घेऊन किश्तवरकडे ही मिनीबस चालली होती. त्याचवेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रोडच्या खाली घसरली आणि थेट दरीत कोसळली. आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे परिष्ठ पोलिस अधीक्षक राजींदर गुप्ता यांनी सांगितले. बसमध्ये जवळपास 30 पेक्षा जास्त प्रवाशी होते अशी माहिती मिळत आहे. मृतांच्या वारसाला 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

X
COMMENT