आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजस्थानात मिनी बसचा भीषण अपघात, महाराष्ट्रातील 13 भाविकांचा मृत्यू तर जण 8 जखमी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले

लातूर- जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील याकतपूर येथून हरयाणातील हिस्सार येथे एका महाराजांच्या दर्शनाला जाणाऱ्या टेम्पो ट्रॅक्सला राजस्थानातील नागौर जिल्ह्यातल्या कुचमानसिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. त्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये लातूर सहा, सोलापूर जिल्ह्यातील दोन तर परभणी, सांगली, बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दोघे जण कर्नाटकातील असल्याची माहिती आहे, पण, असून त्याला दुजोरा मिळालेला नाही. आठ जण जखमी असून त्यांच्यावर नागौर येथे उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लातूर, सोलापूर, जिल्ह्यातील काही जण आपल्या नातेवाईक, मित्रांसोबत हरयाणातल्या हिस्सार येथे एका महाराजांच्या दर्शनासाठी जात होते. त्यांचा टेम्पो ट्रॅक्स (एमएच-23 एएस 7176) शनिवारी पहाटे तीन वाजता राजस्थानातल्या नागौर जिल्ह्यातील कुचमान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किशनगड-हनुमानगड मेगा हायवे वरून जात होती. त्याचवेळी मिनीबसच्या समोर अचानक एक रानगवा आला. त्याला गाडीची ठोकर बसल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याशेजारच्या झाडावर जाऊन आदळली. बसचा वेग जास्त असल्यामुळे बसचा चक्काचूर झाला. या अपघातात  गाडीतील 13 जणांचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले असून त्यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर कुचामन येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

भाषेमुळे ओळख पटवण्यात अडचणी


कुचामन शहराजवळ मिनीबसचा अपघात झाल्यानंतर शेजारून जाणाऱ्या स्थानिक वाहनांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. नागौर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांमार्फत लातूरच्या जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक कार्यालयात संपर्क करण्यात आला. मात्र भाषेच्या अडचणीमुळे नावांचा, गावांच्या नावांचा उच्चार करण्यात अडचणी येत होत्या. त्याचबरोबर माहितीची देवाण-घेवाण करण्यातही अडचणी येत होत्या. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी औसा तहसिलदारांना याची माहिती देऊन याकतपूर गावातील त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. काही नातेवाईक तातडीने राजस्थानकडे रवाना झाले आहेत.

राजस्थानातील अपघातातील मृतांची नावे


भगवान बेम्बडे (50), मयूरी बेम्बडे ( 18 दोघेही रा. याकतपूर, ता औसा, जि. लातूर), सुमित्रा गोवर्धन सांगवे (35), सिद्धी गोवर्धन सांगवे (9 दोघेही रा.लामजना, ता. औसा, जि. लातूर), सुप्रिया बालाजी पवार (16), अरूणा हणमंत तौर (55, दोघेही रा. किल्लारी, जि. लातूर), शालूबाई वसंत शेळके (60), रूक्मिणी ज्ञानेश्वर शेळके (दोघेही रा. चिलाईवाडी, जि. सोलापूर), रामचंद्र तुकाराम पवार (30, रा. सांगली), शिवप्रसाद दत्ता ठाकूर (28, रा. परभणी), श्यामजी गायकवाड (55), बळीराम बालाजी पवार (27, दोघेही रा. कर्नाटक), गोविंद (पूर्ण नाव समजलेले नाही) वय 28 (रा. बीड) असा एकूण 13 जणांचा या
अपघातात मृत्यू झाला आहे. तर, ज्ञानेश्वर वसंत शेळके (35), गायत्री ज्ञानेश्वर शेळके ( 6), श्रावणी ज्ञानेश्वर शेळके (2), लक्ष्मी पांडुरंग शेळके ( 30), प्रताप वसंत शेळके (35, सर्व रा. चिलाईवाडी, जि. सोलापूर), आदर्श सांगवे (6 रा. लामजना, जि. लातूर), अनोळखी महिला (40), अनोळखी मुलगा (7) अशी जखमींची नावे आहेत.गाडी बीड जिल्ह्यातील


अपघातग्रस्त गाडी बीड जिल्ह्यातील असून ती गोविंद रामकिसन इंगळे  (रा. जोधवाडी, जि. बीड) यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. त्याचबरोबर गोविंद नावाचा चालक गाडी चालवत होता. त्याचा मृत्यू झाला असून चालक आणि मालक वेगवेगळे आहेत काय याबाबतची माहिती मिळू शकली नाही.
 

बातम्या आणखी आहेत...