आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार आणि एसयूव्हीच्या धडकेत 13 जणांचा मृत्यू, यामध्ये 5 महिला आणि 2 लहान मुले सामील; 5 जण गंभीर जखमी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू : कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यामध्ये एक कार आणि एसयूव्हीच्या धडकेत 5 महिला आणि 2 मुलांसह 13 लोकांचा मृत्यू झाला. हा अपघात कुनिगलजवळ गुरुवारी रात्री झाला. पोलिसांना आज सकाळी याची माहिती मिळाली. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे अपघात इतका भीषण होता की, 12 लोकांचा जागीच मृत्यू झाला. एका बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. 

तुमकुरू एसपी वामसी कृष्णा यांनी सांगितले की, घटनेदरम्यान आधी एक कार डिव्हायडरला धडकली. त्यानंतर एसयूव्ही कारला येऊन धडकली. सकाळी पोलिसांनी मृतदेह गाडीतून बाहेर काढले. मृतांमध्ये 10 तामिळनाडू आणि 3 बंगळुरूचे राहणारे होते. सर्व कर्नाटक येथील धर्मस्थळाच्या यात्रेसाठी गेले होते.