आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश मूर्तीसाठी पैसे न दिल्याने १३ वर्षीय मुलाची आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा- गणपती मूर्तीसाठी अाजीकडून पन्नास रूपये मिळाले नाही, म्हणून तेरा वर्षाच्या मुलाने अात्महत्या केली. तालुक्यातील भडणे येथे ही घटना घडली. 


भडणे येथील सातवीत शिक्षण घेणारा भूषण भगवान खरकार (पाटील) (वय १३) हा शिंदखेडा येथील जनता हायस्कूलमध्ये शिक्षण घेत हाेता. त्याने गणपती बसवण्यासाठी आजीकडून पैसे मागितले होते. आजीने १५० रुपये दिले. मात्र भूषणने अाणखी ५० रुपयांची मागणी केली. ते देण्यास नकार दिला. म्हणून भूषणला राग आला. त्याने राहत्या घरातील खांबाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

बातम्या आणखी आहेत...