आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 वर्षांची मुलगी शाळेत अचानक पडली आजारी, काही तासांमध्ये झाला तिचा मृत्यू, कोणालाही काही कळेना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मर्सिसाइड - इंग्लंडच्या मर्सीसाइडमध्ये एका 13 वर्षीय मुलीच्या गूढ मृत्यूने सर्वांना आश्चर्यचकित करून सोडले आहे. इबोनी चेसशायर अचानक शाळेत आजारी पडली. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच तिचा मृत्यू झाला. पण तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, याचे उत्तर कोणाकडेही नाही. कारण तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही नॉर्मल आहे. पोलिसांनाही नेमकी केस काय दाखल करावी हे लक्षात येत नाहीये. मुलीच्या आईची मात्र या घटनेने अत्यंत वाईट अवस्था झाली. तिने सोशल मीडियावर तिच्या या वेदना मांडल्या. नेमक्या कोणत्या आजाराने तिची चिमुरडी तिच्यापासून दूर गेली, हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. 

 

नेमके काय घडले..

- मुलीच्या मृत्यूनंतर प्रथमच तिची आई कॅरी यांनी त्यांचे दुःख सर्वांसमोर मांडले. भावूक होत त्यांनी लिहिले, माझी मुलगी मला सोडून गेली. सकाळपर्यंत ती अगदी ठीक होती. आनंदाने रोजसारखी हसत शाळेसाठी तयार होऊन गेली होती. पण नेमके तिला असे काय झाले, की ती निघून गेली? 
- मुलीची आठवण काढत कॅरी रडत रडत जणू तिच्याशी बोलताना ती म्हणाली. तू माझी किती चांगली मैत्रीण आहेस. तू माझ्याशी किती मस्ती करते. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तुझ्याशिवाय उद्याचा दिवस मी पाहू शकत नाही. 
- कॅरीने म्हटले की, मुलीच्या शिवया ती पुढील जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. 

 

पोस्टमॉर्टम रिपोर्टही नील
पोलिसांनी सांगितले की, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मुलीच्या मृत्यूचे कारण समोर ये नाही. तिला काय झाले आणि कशामुळे तिचा मृत्यू झाला याचा तपास केला जात आहे. डॉक्टर्सनी या प्रकरणात काहीही बोलण्यास नकार दिला आहे. कारण त्यांच्याकडे मुलीच्या मृत्यूचे काहीही कारण नाही. 

बातम्या आणखी आहेत...