Home | National | Rajasthan | 13 year old girl molestation and killed

13 वर्षीय मुलीचे अपहरण करुन बलात्कार आणि हत्या, गुन्हा लपवण्यासाठी ओलांडली क्रूरतेची सीमा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 06:24 PM IST

अल्पवयीन तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार, हत्या केल्याप्रकरणी आरोपी तरुणाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

 • 13 year old girl molestation and killed

  श्रीगंगानगर (राजस्थान) : अल्पवयीन तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी आरोपी तरुणाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निर्णय पोक्सो प्रकरणातील विशेष न्यायालयाचे न्यायाधिश संदीप कौर यांनी मंगळवारी सुनावला. सोबतच आरोपीला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

  निर्घृणपणे केली मुलीची हत्या..
  ही घटना चार वर्षे जुनी असून श्रीगंगानगर जिल्ह्यातील बींझबायला गावातील आहे. घमूडवाली पोलिसांनी मृतक 13 वर्षीय मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर 23 ऑगस्ट 2014 रोजी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. त्याचदिवशी पोलिसांना मुलीचा मृतदेह एका नाल्यात आढळून आला होता. मृतदेहाच्या गुप्तांगांवर धारदार शस्त्रांच्या जखमा आढळून आल्या होत्या. इतकेच नाही तर चेहरा ओळखू येऊ नये यासाठी चेहरा अॅसिडने जाळण्यात आला होता. पोलिसांनी घटनेच्या पाचव्या दिवशी बलजिंद्र सिंह उर्फ कुलविंद्र सिंहला हत्येच्या आरोपात अटक केली होती.


  हे पुरावे आले कामी...

  1. ज्यावेळी मुलगी बेपत्ता झाली होती, त्याचवेळी आरोपी कुणालाही न सांगता काम बंद करुन घरी गेला आणि अचानक गायब झाला.
  2. लँडलाइन फोनवरुन डायल नंबर रिडायल केल्यानंतर आरोपीचा मित्र जगदीशच्या मोबाइलवर कॉल लागला.
  3. मुलगी आणि आरोपी एकाच वेळी बेपत्ता झाले होते. जगदीशने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे आरोपीसोबत प्रेमसंबंध होते.

  ज्यांच्या घरी मुलगी काम करायची, त्यांच्या शेजारी बांधकामाचे काम करायचा आरोपी

  एसपीपी बनवारीलाल कडेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, 13 वर्षीय मुलगी एका घरी घरकाम करत होती. आरोपी कुलविंद्र सिंह गावात पीडितेच्या शेजारी राहात होता. तो त्याचे गाव सजनवाला येथून काही लेबर सोबत घेऊन आला होता. तेथे काम करत असताना या मुलीशी त्याचा परिचय झाला. आरोपीने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. घटनेच्या एका दिवसापूर्वी मुलीचा घरमालक त्याच्या पत्नीसोबत नातेवाईकाकडे गेला होता. दुस-या दिवशी सकाळी मुलीचे आरोपीचा मित्र जगदीश मेघवालच्या फोनवरुन बोलणे झाले होते.

  साक्ष: रक्ताने माखलेले कपडे आणि इतर पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने सुनावली शिक्षा

  पोलिसांनी एफएसएल रिपोर्टमध्ये कुलविंद्र सिंहला हत्येचा आरोपी ठरवले होते. अटकेनंतर आरोपीकडून शस्त्र हस्तगत झाले होते, ज्याने मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आरोपीच्या मोटरसायकलवर रक्ताचे डाग आढळून आले होते. तपासणीनंतर रक्त मृतकचे असल्याचे स्पष्ट झाले होते. ज्या ठिकाणी हत्या झाली, तेथील मातीच्या नमुन्यांवर आरोपीच्या पायाचे ठसे आढळले होते. हत्येनंतर आरोपी पसार झाला होता, पण पोलिसांना त्याचे रक्ताने माखलेले कपडे मिळाले होते.

  आरोपीने ओलांडली क्रूरतेची सीमा..
  आरोपीने त्याचा गुन्हा लवपण्यासाठी मुलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर अॅसिडने तिचा चेहरा जाळला. तिच्या गुप्तांगांवर धारदार शस्त्राने घाव केले. आणि तिचा मृतदेह नाल्यात फेकून दिला.

Trending