भारतीय Student ची / भारतीय Student ची कमाल, फक्त 13 व्या वर्षी दुबईत सुरू केली स्वत:ची कंपनी...


केरळचा राहणारा मुलगा 5 वर्षाचा असताना गेला होता दुबईला.

दिव्य मराठी वेब टीम

Dec 17,2018 12:13:00 AM IST

नवी दिल्ली- भारतात टॅलेंटची कमतरता नाहीये. याचे एक उदाहरण समोर आले आहे. भारताच्या 13 वर्षांच्या मुलाने दुबईत स्वत:ची कंपनी स्थापन केली आहे. मुळ केरळचा राहणारा आदित्यन राजेशने दुबईत आपली सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली आहे. दुबईच्या खलीज टाइम्सच्या रिपोर्टनुसार राजेशने 'Trinet Solutions' नावाती कंपनी सुरू केली आहे. राजेशची कंपनी 'Trinet Solutions'मध्ये सध्या तीन कर्मचारी आहेत जे त्याच्या शाळेत शिकणारे त्याचे मित्र आहेत. पाच वर्षाचा असताना कुटुंबासोबत दुबईत झाला होता स्थायीक.


9 वर्षांचा असताना बनवले होते स्वत:चे मोबईल अॅप्लीकेशन

आदित्य राजेशने 9 वर्षांचा असताना पहिला मोबाईल अॅप्लीकेश बनवले होते. राजेशने हे अॅप्लीकेशन बसल्या बसल्या सहजच बोर होत आहे म्हणून बनवले होते. तेव्हापासून त्याने दुसऱ्यासाठी लोगो आणि वेबसाइट बनवण्याचे काम सुरू केले. त्याने सांगितले की, तो पाच वर्षांचा असतानापासून काँप्यूटरचा वापर करतो.


सध्या मोफत सेवा देत आहे राजेशची कंपनी
राजेशने सांगितले की, लीगली त्याला कंपनीचा ओनर बनण्यासाठी 18 वर्ष होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर तो पूर्णपणे काम करणारी कंपनी स्थापन करणार आहे. सध्या त्याच्या कंपनीचे 12 क्लायंट आहेत जे लोगो आणि डिझाइनचे काम मोफत करून देतात.

X
COMMENT