आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःच्याच नवीन घरकुलामध्ये गळफास घेऊन 13 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमडापूर- एका तेरा वर्षीय विद्यार्थ्यांने स्वतःच्या नवीन घरकुला मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना ७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास धोत्रा भनगोजी येथे उघडकीस आली आहे. या बाबत सिद्धार्थ जगन्नाथ गवई वय ४७ यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, धोत्रा भनगोजी येथील राहुल दिनेश गवई वय १३ वर्ष हा सकाळी साडे दहा वाजता शाळेत जातो असे म्हणून घरातून निघून गेला. परंतु संध्याकाळचे पाच वाजून गेल्यानंतर तो घरी परतला नाही. 

 

दरम्यान नातेवाइकांनी त्याचा शोध सुरु केला असता त्याने स्वतःच्याच नवीन घरकुलामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. पुढील तपास ठाणेदार अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका ज्ञानदेव ठाकरे हे करीत आहेत या विद्यार्थ्यांने आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...