आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात लॉन्च झाली 1.31 कोटी रुपयांची 'पोर्शे कायनी कूपे', याच्या टर्बो व्हर्जनमध्ये मिळेल 286 kmph टॉप स्पीड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेफ्टीसाठी 8 एअरबॅग्स, Isofix चाइल्ज सीट माउंट, एबीएस-ईबीडी, ब्रेक असिस्टसह अनेक फीचर्स

ऑटो डेस्क- लग्जरी कार मेकर कंपनी पोर्शेने कयानी कूपे 2020 एडिशन भारतात लॉन्च केली आहे. एरोडायमिक डिजाइन असलेली ही एसयूवी पहिल्यापेक्षा दोन पट जास्त स्पोर्टी आहे. भारतात ही वी-6 आणि टर्बोसारख्या दोन व्हॅरिएंटमध्ये उपलब्ध असेल. याची किंमक 1.31 कोटी ते 1.97 कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकते. या कारची कम्प्लीटली बिल्ट यूनिटम्हणून भारतात विक्री होईल. याच्या  टर्बो व्हर्जनची टॉप स्पीड 286 किमी प्रतितास आहे, म्हणजे दिल्लीवरुन आग्रा (233 किमी) अंतर अर्ध्या तासांपेक्षा कमी वेळेत पार करेल.

एसयूवीमध्ये मिळेल 550 पीएस पॉवर
> कायनीच्या वी-6 कूपेमध्ये 3 लीटर वी-6 इंजिन आहे, जे 340 पीएस पॉवर आणि 450 एनएम टॉर्क जनरेट करेल. याला 100 किमी प्रती तासांच्या वेगावर पोहचण्यासाठी 5.7 सेकंदाचा वेळ लागेल. याची टॉप स्पीड 243 किमी प्रतितास आहे.
> याच्या टर्बो व्हॅरिएंटमध्ये 4 लीटर ट्विन टर्बोचार्ज्ड वी-8 पेट्रोल इंजिन मिळेल. हे 550 पीएस आणि 770 एनएमचे टॉर्क जनरेट करेल. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशन मिळेल. याची टॉप स्पीड 286 किमी प्रतितास आहे.


> याच्या इंटीरिअरमध्ये डॅशबोर्डवर 12.3 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम मिळेल. यात एसी आणि ऑडियो कंट्रोल करण्यासाठी बटनदेखील मिळेल. यात थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हीलदेखील मिळेल. याच्या इंटीरियरमध्ये ऑल-ब्लॅक थीम असेल.


> कूपेमध्ये ऑटो एलईडी हेडलँप, फोर झोन क्लाइमेट कंट्रोल, क्रूज कंट्रोल, 18-वे एडजस्टेबल फ्रंट सीट्स, रिअर कॅमेरा, फ्रंट/रियर पार्किंग सेंसरसारखे फीचर्स स्टँडर्ड मिळतील.


> याशिवाय यात सेफ्टीसाठी 8 एअरबॅग्स, Isofix चाइल्ज सीट माउंट, एबीएस-ईबीडी, ब्रेक असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट आणि हील डिसेंट असिस्टसारखे फीचर्सदेखील मिळतील.

बातम्या आणखी आहेत...