आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

स्वातंत्र्यदिनी 132 शूर सैनिकांचा गौरव, एअरस्ट्राइक करणाऱ्या टीमला 13 शौर्य, अभिनंदनला वीरचक्र

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली ।- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी १३२ शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. बालाकोटमध्ये एअरस्ट्राइक करणाऱ्या पथकातील १३ जवानांना शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाईल. पाकचे एफ-१६ विमान पाडणारे विंग कमांडर अिभनंदन वर्तमान यांना वीरचक्र हा युद्धकाळातील तिसरा मोठा सन्मान मिळेल. अंबाला एअरफोर्स स्टेशनवर तैनात असताना पाकची विमाने रडारवर टिपून माहिती देणाऱ्या स्क्वॉड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना युद्ध सेवा पदक बहाल केले जाईल.

बालाकोट एअरस्ट्राइकच्या पथकाला सर्वाधिक सन्मान
- विंग कमांडर अभिनंदन वर्तमान : वीरचक्र, पाक विमान पाडले.
- मिंटी अग्रवाल : युद्ध सेवा पदक, हल्ल्याची माहिती दिली.
- एअर कमाेडोर काशीनाथ : युद्ध सेवा पदक, पथकाचे सूत्रधार.
- यशपाल नेगी : युद्ध सेवा पदक, एअरस्ट्राइकची जबाबदारी होती. 
- ९ पायलट : सौमित्र तमसकर, प्रणव, अमित रंजन, राहुल बसोया, पंकज भुजाडे, बीकेएन रेड्डी, शशांक सिंह, हेमंतकुमार, हंसल जोसेफ.

शहीद जवान प्रकाश जाधव यांना कीर्तिचक्र : प्रकाश जाधव गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शहीद झाले. सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट हर्षपालसिंह यांना कीर्तिचक्र सन्मान.

जम्मूत निर्बंध हटवले: जम्मू भागातून निर्बंध पूर्णपणे काढून घेण्यात आले. काश्मीरमध्ये मात्र ते कायम राहतील. एडीजी मुनीर खान म्हणाले, ‘काश्मीरमध्ये काही भागांत सुरक्षा व्यवस्थेत सूट देऊन चालणार नाही.’

फैजल नजरकैदेत :
इस्तंबूलला निघालेले जम्म्ू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंटचे शहा फैजल श्रीनगरला नजरकैदेत.