आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुझफ्फरपुरात तापाने एका आठवड्यात १३३ मुलांचा मृत्यू; लोक घर सोडून जाताहेत, डॉक्टरांना ना आजार माहीत ना औषध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुझफ्फरपूर - बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्हा पाटण्यापासून ७२ किमी अंतरावर आहे. मात्र, गेल्या एक आठवड्यापासून उपचाराअभावी येथे बालकांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. सोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात तापामुळे मृत्यू पावलेल्या मुलांची संख्या १३३ झाली आहे. १५१ मुले रुग्णालयांत दाखल आहेत. मात्र आजार कोणता आहे  याबाबत डॉक्टरांनी ठोस निदान केलेले नाही. त्यामुळे या मुलांना कोणते औषध द्यावे याचा संभ्रम आहे. मागच्या तीन दिवसांत तीन तासांनी सरासरी एका मुलाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रविवारी मुलांच्या मृत्यूबाबत बैठक सुरू असताना आरोग्यमंत्री मंगल पांडेय सामन्याचा स्कोअर विचारत होते. त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एका संस्थेने पांडेय आणि केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यावर खटला दाखल केला आहे. या आजाराच्या भीतीने लोक मुलाबाळांसह स्थलांतर करत आहेत. अनुपमनगरचे रणधीर सिंह यांनी बायकोला दोन मुलांसह माहेरी पाठवले आहे. मुशहरी येथील राहुल कुमारने उन्हाळी सुट्टीसाठी मुलांना आजोळी पाठवले होते. मात्र, या आजारामुळे त्यांना पुन्हा घरी आणण्याची त्यांची इच्छा नाही.

 

पाच वर्षांत सरकारची ना भाषा बदलली ना स्थिती, दर ३ तासाला एका बालकाचा मृत्यू 
 

 

22 जून 2014 : १०० खाटांचे रुग्णालय करू : हर्षवर्धन

२०१४ मध्ये मुलांच्या मृत्यूनंतर आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन येथे आले होते. १०० खाटांच्या रुग्णालयाचे आश्वासन दिले होते. 

 

16 जून 2019 : आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा पुनरुच्चार
रविवारी डॉ. हर्षवर्धन पुन्हा येथे आले होते. १०० खाटांच्या रुग्णालयाचा पुनरुच्चार केला.