आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - इंटेलिजन्स तंत्रज्ञानात होत असलेल्या गुंतवणुकीमुळे पुढील एका दशकात जीडीपीमध्ये चांगली वाढ होण्याची अपेक्षा आहे. मात्र, जर या दरम्यान भारताने कौशल्यातील कमतरता दूर केली नाही तर यामुळे देशाच्या जीडीपीला १.९७ लाख कोटी डॉलर (सुमारे १३८ लाख कोटी रुपये)चे नुकसान होण्याची शक्यता आहे. कन्सल्टिंग आणि व्यावसायिक सेवा देणारी जागतिक संस्था एक्सेंचरच्या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
“फ्यूलिंग इंडियाज स्किल रिव्होल्यूशन’ या नावाच्या या अहवालानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर/व्हीआर) आणि ब्लॉकचेनसारख्या अॅडव्हान्स तंत्रज्ञानामुळे लोकांमधील कौशल्य वाढवण्यास मदत होऊ शकते. यातून लोकांचे पुनर्कौशल्याचे काम तेजीने होऊ शकते. तसेच हे जास्त प्रभावी आणि परवडणारेही आहे.
भारतात अॅक्सेंचरच्या प्रमुख तसेच वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक रेखा एम मेनन यांनी सांगितले की, काळानुसार नोकऱ्यांचे स्वरूप तेजीने बदलत आहे. लोकांना कामाच्या दरम्यानच प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या कौशल्याला विकसित करण्यासाठी एआय, अॅनालिटिक्स आणि ब्लाॅकचेन सारखे डिजिटल टूल्स कामाचे सिद्ध होतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.